कोलकाता - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India v West Indies ) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारताने 17 धावांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवत क्लीन स्वीप दिला. या सामन्यात आवेश खानने भारतीय संघात पदार्पण केले ( Awesh Khan debut for Indian team ) आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने आपले पदार्पण होणार आहे. हे कळल्यावर त्याची काय भावना होती ती स्पष्ट केली.
-
#TeamIndia debut 👏
— BCCI (@BCCI) February 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Message from Captain & Head Coach 💬
Relishing the responsibility 👍@venkateshiyer chats up with @Avesh_6 after India's T20I series sweep against West Indies in Kolkata. 👌 👌 - By @Moulinparikh
Full interview 🎥 🔽 @Paytm #INDvWI https://t.co/MrvekFS7yc pic.twitter.com/r0PLXvkktP
">#TeamIndia debut 👏
— BCCI (@BCCI) February 21, 2022
Message from Captain & Head Coach 💬
Relishing the responsibility 👍@venkateshiyer chats up with @Avesh_6 after India's T20I series sweep against West Indies in Kolkata. 👌 👌 - By @Moulinparikh
Full interview 🎥 🔽 @Paytm #INDvWI https://t.co/MrvekFS7yc pic.twitter.com/r0PLXvkktP#TeamIndia debut 👏
— BCCI (@BCCI) February 21, 2022
Message from Captain & Head Coach 💬
Relishing the responsibility 👍@venkateshiyer chats up with @Avesh_6 after India's T20I series sweep against West Indies in Kolkata. 👌 👌 - By @Moulinparikh
Full interview 🎥 🔽 @Paytm #INDvWI https://t.co/MrvekFS7yc pic.twitter.com/r0PLXvkktP
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारताला आमंत्रित केले होते. त्यानुसार भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या होत्या. तसेच वेस्ट इंडिजला 185 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठाग करताना वेस्ट इंडिज संघ करताना निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 167 धावाच करु शकला. त्यामुळे भारताने हा सामना जिंकत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देत ( India gave clean sweep to WI ) मालिका खिश्यात घातली.
हा सामना जिंकल्यानंतर आवेश खानने आपले भारतीय संघात पदार्पण होणार आहे, हे कळल्यावर काय भावना होती. त्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, मॅचमध्ये खेळताना मी थोडा नर्व्हस झालो, जेव्हा मला कळलं की मी खेळत आहे आणि पदार्पण करत आहे, तेव्हा मी थोडा घाबरलो. कारण ज्या गोष्टीसाठी मी खूप मेहनत करत होतो ती गोष्ट अखेर घडणार होती. रोहित भाई (रोहित शर्मा) यांनी मला खेळादरम्यान पूर्ण पाठिंबा दिला, राहुल सर (द्रविड) यांनी मला माझ्या पदार्पणाच्या खेळाचा आनंद घेण्यास सांगितले. व्यंकटेश अय्यर यांनीही मला याचा आनंद घ्या असे सांगितले. हा दिवस पुन्हा येणार नाही कारण ही डेब्यू मॅच आहे आणि मी आज त्याचा आनंद लुटला.
आपला आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना संपल्यानंतर ( Awesh Khan told about debut match ) आपल्या भावना व्यक्त करताना आवेश खान म्हणाला, मला ते खूप छान वाटले. भारतासाठी खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि ते माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मला खूप बरे वाटत आहे आणि मी संपूर्ण सामन्याचा आनंद लुटला. मला खूप आनंद झाला, कारण आम्ही सामनाही जिंकला.