ETV Bharat / sports

महिला वेगवान गोलंदाज मेगन शटच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिच्या घरी चिमुकलीचे आगमन झालं आहे. मेगनने शनिवारी सांगितलं की, तिची पार्टनर पत्नी जेस हिने 17 ऑगस्ट रोजी बाळाला जन्म दिला.

australian-fast-bowler-megan-schutt-partner-gives-birth-to-daughter
महिला वेगवान गोलंदाज मेगन शटच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म
author img

By

Published : Aug 21, 2021, 6:50 PM IST

अॅडलेड - ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिच्या घरी चिमुकलीचे आगमन झालं आहे. मेगनने शनिवारी सांगितलं की, तिची पार्टनर पत्नी जेस हिने 17 ऑगस्ट रोजी बाळाला जन्म दिला. मेगन हिने नवजात मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

मेगन शट तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, आमचा चिमुकला पाहुणा 24 आठवड्यानंतर आपत्कालीन सी सेक्शनच्या माध्यमातून जन्मला. आम्हाला सांगण्यात आले होते की, तो कोणत्याही क्षणी जगामध्ये येऊ शकतो.

दरम्यान, मेगन शट हिने मार्च 2019 मध्ये तिची महिला साथीदार क्रिकेटर जेस होलोएक हिच्यासोबत लग्न केलं होतं. मे 2021 मध्ये तिने बाळासंदर्भात गोड बातमी देखील दिली होती. तिने त्यावेळी सांगितलं होतं की, जेस नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते.

मेगन शटच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज लॉरेन चीटल हिने शुभेच्छा दिल्या आहेत. ती तिच्या पोस्टमध्ये म्हणते, तुम्हा दोघांना शुभेच्छा. ती खूप सुंदर आहे. न्यूझीलंडची कर्णधार एमी सॅटरथवेट हिने देखील मेगन-जेस जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

मेगन शटने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने 65 एकदिवसीय सामन्यात 99 गडी बाद केले आहेत. तर 73 टी-20 सामन्यात तिच्या नावे 96 विकेट आहेत. भारताविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत मेगन शटने वैयक्तिक कारण देख माघार घेतली आहे.

हेही वाचा - अफगाणिस्तानमध्ये स्थानिक टी-20 स्पर्धेचे आयोजन

हेही वाचा - सचिनची नव्हे तर 'या' फलंदाजांची वाटायची भीती, मुरलीधरनची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.