नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे माजी कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे सिडनीमध्ये निधन झाले. कर्णधार पॅट कमिन्सची आई मारिया यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्टी बांधली. ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आदराचे चिन्ह म्हणून काळ्या हातपट्ट्या : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अंतिम कसोटीचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डकडून दुःखद बातमी मिळाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मारिया कमिन्सचे रात्री निधन झाल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या वतीने, आम्ही पॅट, कमिन्स कुटुंब आणि त्यांच्या मित्रांप्रती मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आज आदराचे चिन्ह म्हणून काळ्या हातपट्ट्या घालेल.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया 4था कसोटी सामना थेट स्कोअर : 109 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 301/4 आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा पूर्ण केल्या आहेत. 6 विकेट्स अजून शिल्लक आहेत. ख्वाजा 133 आणि ग्रीन 71 धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाज सकाळपासून विकेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अद्याप कोणालाच यश मिळालेले नाही. कॅमेरॉन ग्रीनने अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाने 104 षटकांत 285/4 धावा पूर्ण केल्या. कॅमेरून अर्धशतक ठोकल्यानंतर 61 धावांवर खेळत आहे. उस्मान आणि ग्रीन यांच्यात 117 धावांची भागीदारी झाली आहे. उस्मान ख्वाजा 127 धावांवर खेळत आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 90 षटकांत चार विकेट गमावत 255 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने कसोटी कारकिर्दीतील तेरावे शतक झळकावले. ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियाच्या डावाचे नेतृत्व करतील. ग्रीन 49 धावांवर खेळत आहे.