लाहोर: ऑस्ट्रेलियाने मंगळवारी एकमेव टी-20 सामन्यात तीन गडी राखून जिंकत ( Australia won by 3 wkts ), 24 वर्षांतील पहिला पाकिस्तान दौरा संपवला. कर्णधार अॅरॉन फिंचच्या ( Captain Aaron Finch ) 55 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाच चेंडू बाकी असताना 7 बाद 163 धावांवर विजय मिळवला. बेन मॅकडरमॉटने (नाबाद 22) हॅरिस रौफला चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 162 धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी, नॅथन एलिसने 28 धावांत चार बळी घेतल्याने, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला आठ बाद 162 धावांवर रोखले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझमने ( Batter Babar Azam ) 46 चेंडूत 66 धावांची खेळी केली. 1998 नंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली. मात्र एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यांना 1-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले.
-
At the end of a hard-fought T20I, Pakistan and Australia players exchanged shirts, caps and bats, a memorable end to a truly historic tour.#BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Y2kxFqjgKJ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">At the end of a hard-fought T20I, Pakistan and Australia players exchanged shirts, caps and bats, a memorable end to a truly historic tour.#BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Y2kxFqjgKJ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 6, 2022At the end of a hard-fought T20I, Pakistan and Australia players exchanged shirts, caps and bats, a memorable end to a truly historic tour.#BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Y2kxFqjgKJ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 6, 2022
पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने ( Batter Travis Head ) 14 चेंडूत 26 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि फिंचसह 21 चेंडूत 40 धावा जोडून ऑस्ट्रेलियाला झटपट सुरुवात करून दिली. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या जोश इंग्लिसनेही 24 धावांचे योगदान दिले. तर मार्कस स्टॉइनिसने अवघ्या नऊ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या.
या सामन्यात पाकिस्तानची गोलंदाजीही दिशाहीन होती. हसन अलीने तीन षटकात 30 धावा दिल्या, परंतु त्याला कोणतेही यश मिळाले नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमने ( Fast bowler Mohammad Wasim ) (30 धावांत 2 विकेट्स) स्टॉइनिस आणि कॅमेरून ग्रीनला लागोपाठच्या षटकांत बोल्ड केले. शाहीन आफ्रिदीने (21 धावांत 2 बळी) 19व्या षटकात फिंच आणि सीन अॅबॉटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले मात्र मॅकडरमॉटने संघाला लक्ष्यापर्यंत नेले. तत्पूर्वी, आझम आणि मोहम्मद रिझवान (23) यांच्यातील 67 धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करणाऱ्या तीन खेळाडूंपैकी एक असलेल्या ग्रीनने रिझवानला बोल्ड करुन ही भागीदारी तोडली. पुढच्याच चेंडूवर ग्रीनने फखर झमानला (0) मिडऑनला फिंचकरवी झेलबाद केले.
अॅडम झाम्पाने (29 धावांत 1 बळी) बाबरला 16व्या षटकात नॅथन एलिसकरवी झेलबाद केले. त्याने 46 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. एलिसने शेवटच्या दोन षटकांत तीन बळी घेत खालची मधली फळीचा शेवट केला. पण उस्मान कादिरने नवोदित वेगवान गोलंदाज बेन ड्वार्हुइसच्या ( Fast bowler Ben Dwarhuis ) शेवटच्या षटकात 18 धावा जोडून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. बेनने 42 धावा खर्च केल्या, तर त्याला कोणतेही यश मिळाले नाही.
हेही वाचा - Ipl 2022 Point Table : पराभवानंतर ही राजस्थान अव्वल स्थानी कायम, तर विजयानंतर बंगळूरुची मोठी झेप