ETV Bharat / sports

Anya Shrubsole Retirement : इंग्लंडची वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती - वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोले

इंग्लंडची खेळाडू अन्या श्रबसोलेने ( Fast bowler Anya Shrabsole ) वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अन्याने इंग्लंडकडून 173 सामने खेळले असून 227 विकेट घेतल्या आहेत.

Anya Shrubsole
Anya Shrubsole
author img

By

Published : Apr 14, 2022, 5:46 PM IST

हैदराबाद: इंग्लंडची वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोले ( Anya Shrubsole ) हिने क्रिकेट जगतातून निवृत्ती घेतली ( Anya Shrubsole announces retirement ) आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला आहे. अन्याने 173 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 227 विकेट घेतल्या आहेत.

  • “I feel immensely privileged to have been able to represent my country for the past 14 years."

    After 173 games and 227 wickets for her country, @anya_shrubsole has announced her retirement from international cricket today.#ThankYouAnya

    — England Cricket (@englandcricket) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नुकत्याच संपलेल्या महिला विश्वचषक 2022 ( Women's World Cup 2022 ) मध्ये इंग्लंडकडून अंतिम सामना खेळला होता. आन्याने 8 कसोटी सामने, 86 वनडे आणि 79 टी-20 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने कसोटी सामन्यात 19 विकेट आणि 118 धावा केल्या. वनडेत 106 विकेट घेतल्या आणि 285 धावा केल्या. त्याचवेळी, टी-20 सामन्यात तिने 102 विकेट्स घेतल्या आणि 104 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना अन्या ( Anya Shrubsole on retirement ) म्हणाली, ''गेल्या 14 वर्षांपासून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकले याचा मला खूप सन्मान वाटतो. महिला क्रिकेटच्या विकास काळात क्रिकेटमध्ये सहभागी होणे ही सन्मानाची बाब आहे, परंतु मी शक्य तितक्या वेगाने पुढे जात आहे, हे मला स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माझी दूर जाण्याची वेळ आली आहे.''

अन्याने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ( Anya Shrubsole Debut international cricket ) केले होते. त्यादरम्यान तिने सर्वात पहिला एकदिवसीय सामना 14 ऑगस्ट 2008 साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर पदार्पणाचा कसोटी सामना 11 ऑगस्ट 2013 रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध खेळला होता. तसेच टी-20 सामना 23 ऑगस्ट 2008 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता.

हेही वाचा - World Junior Shooting Competition : जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनुष्काची भारतीय संघात निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.