काबुल - अफगानिस्तानमध्ये तालिबानने सत्ता मिळवली आहे. अशात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्थानिक टी-20 स्पर्धा शपागीजा क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या स्पर्धेचे आयोजन 10 ते 25 सप्टेंबर या दरम्यान, काबुल क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे.
शपागीजा क्रिकेट लीगमध्ये संघाची संख्या वाढवण्यात आली आहे. सुरूवातीला या लीगमध्ये 6 संघ सहभागी होत होते. आता यात आणखी दोन नव्या संघाची भर पडली आहे. यंदाचा हा या लीगचा आठवा हंगाम आहे.
काबुलमधील एसीबीच्या मुख्य कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात आज सर्व आठ फ्रेंचायझीना अधिकार बहाल करण्यात आले. आठ फ्रेंचायझीमध्ये हिंदुकुश स्टार्स, पामिर जालमियां, स्पीनघर टायगर्स, काबुल इगल्स, एमो शार्क्स, बोस्ट डिफेंडर्स, बंद-ए अमिर ड्रेगंस, मिस ए एइनाक नाइट्सचा समावेश आहे. यातील हिंदुकुश स्टार्स आणि पामिर अलियान हे दोन नवे संघ आहेत.
एसीबीचे मुख्य अधिकारी हामिद शिंवारी यांनी सांगितलं की, यावेळी एससीएल दर्शक आणि चाहत्यांना नविन अनुभव देईल. तसेच या लीगच्या माध्यमातून खेळाडूंना चांगला आर्थिक फायदा होईल.
हेही वाचा - यूपी सरकारचा टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
हेही वाचा - सॅल्युट! मारिया आंद्रेजिकने चिमुकल्याच्या सर्जरीसाठी टोकियोत जिंकलेले रौप्य पदक विकलं