ETV Bharat / sports

Controversy in IPL : श्रीसंतच्या श्रीमुखात लावल्यापासून ते 'मंकडिंग' प्रकरण; आयपीएलमध्ये गाजलेले 'हे' सहा वादविवाद - IPL 2022 latest news

2008 साली आयपीएलला सुरुवात झाली. तेव्हापासून क्रिकेट जगतात आयपीएल ही सुपरहिट ठरली आहे. मात्र, त्यात काही वादही घडले आहे. याबद्दल आपण जाणून घेणार ( Controversy in IPL ) आहोत.

Controversy in IPL
Controversy in IPL
author img

By

Published : Mar 26, 2022, 7:55 PM IST

हैदराबाद - आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार ( IPL 2022 ) आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता ( CSK VS KKR ) यांच्यात पहिला सामना पार पडणार आहे. 2008 साली सुरु झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचा फंडा सुपरहिट ठरला आहे. मात्र, तेवढाच वादग्रस्तही आहे. पहिल्या हंगामापासून क्रिकेटपेक्षा आयपीएलमधील वादांचीच जास्त चर्चा आहे. मग ते हरभजन सिंगने श्रीसंतला मारलेली थापड अथवा ललित मोदींचे निलंबन असो. आयपीएलच्या विश्वाला वेगळा तडका देणाऱ्या या वादविवादांबाबात ( Controversy in IPL ) आपण जाणून घेणार आहोत.

1. 2008 साली हरभजनसिंगने-श्रीसंतच्या श्रीमुखात लावली - हरभजन आणि वादविवाद यांचे नाते आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात जबरदस्त वाद झाला होता. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यानंतर श्रीसंतला अचानक रडताना दाखविण्यात आले आहे. श्रीसंत हरभजनला काहीतरी विनोदात म्हणाला होता. मात्र, हा विनोद हरभजनला सहन झाला नाही. त्याने त्याच्या कानाखाली लगावून दिली.

2. 2010 साली ललित मोदीला हटवले - ललित मोदी हे आयपीएलचे पहिले अध्यक्ष होते. गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर त्यांना बरखास्त करण्यात आले आहे. तपसाअंती त्यांना दोषी ठरवण्यात आले. 2013 साली त्यांच्यावर आजीवन बंदी घातली गेली. ललित मोदी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. तसेच, अंमलबजावणी संचालनालयाने त्यांचा तपास करण्यापूर्वीचे ते लंडनला पळून गेले.

3. 2012 साली शाहरुखला वानखेडेवर प्रवेशबंदी - कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान 2012 साली मोठ्या वादात अडकला होता. मुंबई इंडियन्सचा कोलकाता सोबत सामना झाल्यानंतर त्याचा वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता. सुरक्षा रक्षकांनी मुलांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप शाहरुखने केला होता. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुखवर वानखेडेमध्ये 5 वर्षांची बंदी घातली होती.

4. 2013 आयपीएल मॅच फिक्सिंग - मॅच फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना अटक केली होती. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला होता. त्यामध्ये एस श्रीसंत, अजीत चंदीला आणि अंकित चवान यांचा समावेश होता. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली.

5. 2015 साली दोन संघावर निलंबित - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई आणि राजस्थान या संघांना आयपीएलमधून निलंबित करण्यात आले होते. बीबीसीआयचे निलंबित अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक श्रीनिवासन यांचे जावाई गुरुनाथ मय्यपन हे बेंटिंग प्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. दोन्ही संघ 2018 साली पुन्हा खेळू लागले.

6. 2019 साली अश्विनचा 'मंकडिंग' घोटाळा - किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलरला मंकडिंग करत धावबाद केले होते. ६९ धावांवर खेळत असलेला जोस बटलर त्यावेळी नॉन स्ट्राईकवर उभा होता. चेंडू टाकण्याआधीच तो धाव घेण्यासाठी पुढे गेला, त्यावेळी अश्विनने संधी साधत त्याला ‘मंकडिंग’ केलं. या मुद्द्यावरून नंतर बराच वादंग निर्माण झाला होता. अनेक क्रिकेटमधील तज्ञ्ज मंडळींना यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, अखेर अश्विनने केलेली बाब ही क्रिकेटच्या नियमाला धरुनच असल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा - CSK VS KKR, IPL 2022 : आयपीएलचा महासंग्राम आजपासून; रविंद्र जडेजा-श्रेयस अय्यर आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.