टोकियो - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार सुरूवात केली. तिने ग्रुप जे मधील पहिल्या सामन्यात इज्राइलच्या सेनिया पोलिकारपोवा हिचा अवघ्या 29 मिनिटांत धुव्वा उडवला. सिंधूने हा सामना 21-7, 21-10 असा एकतर्फा जिंकला.
महिला एकेरीत सिंधू भारताचे प्रतिनिधीत्व करणारी एकमेव खेळाडू आहे. तसेच ती रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती आहे. यामुळे तिच्याकडून यंदा देखील पदकाची आशा व्यक्त केली जात आहे. सिंधूने पदक मिळवण्याच्या दृष्टीने पहिल्या सामन्यात जोरदार खेळ केला.
पहिल्या सामन्यात सिंधू विरोधी खेळाडूवर संपूर्णपणे वर्चस्व गाजवले. तिने सलग 13 पॉईंट घेतले. ती 11-5 ने पुढे होती. ही आघाडी तिने अखेरपर्यंत राखत पहिला गेम तिने 21-7 असा अवघ्या 13 मिनिटात जिंकला. दुसऱ्या गेम तिने 16 मिनिटात जिंकला.
सिंधूचा पुढील सामना हाँगकाँगच्या च्युंग एनगान यी हिच्याशी 27 जुलैला होणार आहे. दरम्यान, सिंधूने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट आरामात मिळवले. कारण ती जागतिक क्रमवारीत टॉप-10 खेळाडूंमध्ये होती.
हेही वाचा - Tokyo Olympics : पिस्तूलने मनु भाकरचे स्वप्न मोडले; मोक्याच्या क्षणी दिला दिला दगा
हेही वाचा - Tokyo Olympics : महिला हॉकीत नेदरलंडकडून भारताचा 5-1 ने पराभव