ETV Bharat / sports

सय्यद मोदी चॅम्पियनशिप : श्रीकांत, साईप्रणीत, प्रणॉयची विजयी सुरुवात - सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा

श्रीकांतने पहिल्या फेरीत रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा २१-१२, २१-११ असा सरळ पराभव केला. त्याने हा सामना अवघ्या ३६ मिनिटात जिंकला. दुसऱ्या फेरीत त्याची भारताच्या पारुपल्ली कश्यपशी गाठ पडणार आहे. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली आहे.

Syed Modi International: Kidambi Srikanth, B Sai Praneeth and HS Prannoy Sail Through to 2nd Round
सय्यद मोदी चॅम्पियनशिप : श्रीकांत, साईप्रणीत, प्रणॉयची विजयी सुरूवात
author img

By

Published : Nov 28, 2019, 11:44 AM IST

Updated : Nov 28, 2019, 2:04 PM IST

लखनौ - येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांनी विजयी सुरुवात केली आहे.

श्रीकांतने पहिल्या फेरीत रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा २१-१२, २१-११ असा सरळ पराभव केला. त्याने हा सामना अवघ्या ३६ मिनिटात जिंकला. दुसऱ्या फेरीत त्याची भारताच्या पारुपल्ली कश्यपशी गाठ पडणार आहे. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली आहे.

Syed Modi International: Kidambi Srikanth, B Sai Praneeth and HS Prannoy Sail Through to 2nd Round
साई प्रणीत

चौथ्या मानांकित साईप्रणीतने मलेशियाच्या इस्कांदर झुल्करनैनचा २१-१६, २२-२० असा पराभव केला. तर बिगरमानांकित प्रणॉयने चीनच्या लि शिया फेंग विरुध्द संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, २१-१३ अशी बाजी मारली.

एच. एस. प्रणॉय

मागील आठवड्यात स्कॉटिश ओपन जिंकणारा भारताचा युवा १८ वर्षीय खेळाडू लक्ष्य सेनला फ्रान्सचा प्रतिस्पर्धी खेळाडू थॉमस रॉक्सेलने स्पर्धेतून माघार घेतल्याने पुढे चाल मिळाली.

हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!

हेही वाचा - 'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो'

हेही वाचा - 'सिंधू तू भारताची शान', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधळली स्तुतीसुमने

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.