नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयामार्फत क्रीडा मंत्रालयाने मलेशियन सरकारकडे संपर्क साधला आहे. २5 मे ते 30 मे या कालावधीत नियोजित मलेशियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघाला परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे.
मलेशियाने भारतातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढत्या कोविड-१९च्या प्रकरणांमुळे तात्पुरती प्रवास बंदी केली आहे.
"या आठवड्याच्या सुरुवातीला केलेल्या प्रारंभिक विनंतीनंतर मलेशियातील भारतीय उच्चायुक्तांना मलेशियन सरकारकडून माहिती मिळाली आहे की भारतीय संघाचा प्रवास शक्य होणार नाही. तथापि, स्पर्धा सुरू होण्यास १९ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे प्रवास करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही,'' असे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी १५ जून रोजी स्पर्धा होणार असल्यामुळे मलेशियन ओपन स्पर्धा ही शेवटची टुर्नामेंट असणार आहे. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, साई प्रणीथ, सत्वीकसाईराज रणकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या सारख्या अव्वल भारतीय सिंग आणि डबल बॅटमिंटनपट्टू यात सहभागी होणार आहेत.
मागील महिन्यात, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाव्हायरस प्रकरणात झालेल्या वाढीमुळे इंडिया ओपन २०२१ ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. इंडिया ओपनला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धा म्हणून वर्गीकृत केले गेले होते आणि २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या काही स्पर्धांपैकी ही एक होती.
११ ते १६ मे दरम्यान नवी दिल्लीतील केडी जाधव इंडोर हॉलमध्ये बंद ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती.
हेही वाचा - 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'' व इंग्लंड विरुध्दच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा