व्हिएतनाम - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू आणि राष्ट्रीय विजेता सौरभ वर्माने व्हिएतनाम येथे सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्याने जपानच्या मिनोरू कोगाला उपांत्य सामन्यात २२-२०, २१-१५ असे हरवले.
-
Sourabh cruised through to FINALS! ⚡️
— BAI Media (@BAI_Media) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🇮🇳’s @sourabhverma09 stormed into the Final of #YonexSunrise Vietnam Open 2019 after he sinks 🇯🇵’s Minoru Honda by 22-20,21-15.
Well done champ!🔥👏
Go for the GOLD!#IndiaontheRise #Badminton pic.twitter.com/eVQwb9lr4W
">Sourabh cruised through to FINALS! ⚡️
— BAI Media (@BAI_Media) September 14, 2019
🇮🇳’s @sourabhverma09 stormed into the Final of #YonexSunrise Vietnam Open 2019 after he sinks 🇯🇵’s Minoru Honda by 22-20,21-15.
Well done champ!🔥👏
Go for the GOLD!#IndiaontheRise #Badminton pic.twitter.com/eVQwb9lr4WSourabh cruised through to FINALS! ⚡️
— BAI Media (@BAI_Media) September 14, 2019
🇮🇳’s @sourabhverma09 stormed into the Final of #YonexSunrise Vietnam Open 2019 after he sinks 🇯🇵’s Minoru Honda by 22-20,21-15.
Well done champ!🔥👏
Go for the GOLD!#IndiaontheRise #Badminton pic.twitter.com/eVQwb9lr4W
हेही वाचा - टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार
सौरभ आणि कोगा यांच्यातील हा उपांत्य सामना ५१ मिनिटे रंगला होता. सौगभ आणि कोगा यांच्यातील हा दुसरा सामना होता. आणि या दोन्ही सामन्यात सौरभने विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात सौरभला चीनच्या सुन फेई शिआंगशी खेळावे लागणार आहे. या विजयानंतर सौरभने ट्विटरवर अंतिम सामन्यातील लढतीविषयी पोस्ट शेअर केली आहे.
सौरभने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानी असलेल्या व्हिएतनामच्याच टिएन मिन्ह एनगुएनला हरवले. या सामन्यात सौरभने २१-१३, २१-१८ अशा सरळ सेटमध्ये एनगुएनला पराभूत केले. हा सामना ४३ मिनिटे रंगला होता. याआधीच्या झालेल्या दोन लढतीत एनगुएनने सौरभला मात दिली होती. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंपैकी फक्त सौरभने आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. ५२ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीअगोदरच्या सामन्यात त्याने जपानच्या यू इगार्शीला २५-२३, २४-२२ असे हरवले होते.
इतर सामन्यांत सिरिल वर्मा आणि शुभांकर डे यांना पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानी असलेल्या सिरिलने मलेशियाच्या डेरेन लियूला १७-२१, २१-१९, २१-१२ असे हरवले होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीअगोदरच्या सामन्यात त्याला चीनच्या लेइ लान शीने हरवले. दुसरीकडे, तिसऱ्या सीडेड शुभांकरला मलेशियाच्या जिया वेई टेनने ११-२१, १७-२१ असे हरवले.