लखनऊ - 'लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती'. हे वाक्य उत्तर प्रदेशच्या लखनऊ जिल्ह्यातील एका दिव्यांग तरूणाने सिद्ध करून दाखवले. शशांक कुमार असे या अनेक युवकांचे प्रेरणा बनलेल्या तरूणाचे नाव. बालपणी पोलिओमुळे दोन्ही पायात अपंगत्व आले. मात्र शशांकने सिद्ध केले की, यश हे आर्थिक कमजोरी किंवा शारिरीक सुदृढतेने मिळत नाही तर जिद्दीने प्राप्त होते. शशांकने व्हीलचेयरच्या सहाय्याने बॅडमिंटन स्पर्धेत ८ राष्ट्रीय आणि १ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून पदके मिळवली आहे.
बाराबंकी मध्ये राहणाऱ्या शशांकला वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओ झाला. घरची आर्थिक परिस्थिती देखील बेताचीच. 1999 साली शशांकच्या उपचारासाठी भाऊ सत्यनारायण आणि राजेश सोबत लखनऊला आले. खासगी हॉस्पीटलची फी देवू शकले नाही. त्यामुळे उपचारात दिरंगाई झाली आणि दोन्ही पायात अपंगत्व आलं. शशांक म्हणाला की, दोन्ही पायांनी अपंग झाल्यावर लोकं नीट वागायचे नाही. पैशाअभावी उपचार देखील व्हायचा नाही. त्यामुळे परिवारासाठी आपण काही तरी केले पाहिजे, यासाठी निर्धार केला आणि आज मला हे फळ मिळाले.
क्रिकेटकडे जास्त ओढ -
शशांक म्हणाला की, माझ्या भावाला क्रिकेट पाहणे खूप आवडायची. त्याने माझ्यासाठी बॅट आणली होती. मात्र क्रिकेटसाठी व्हीलचेयरचे सामने होत नसे. त्यानंतर एका मित्राकडून बॅडमिंटन स्पर्धेत व्हीलचेयरचे सामना होतात, अशी माहिती मिळाली. प्रशिक्षक गौरव भाटिया यांनी मला खूप मदत केली. त्यांच्या माध्यमातून व्हीलयचेअर प्राप्त झाली. पहिला आंतरराष्ट्रीय सामना दवाखान्यातील व्हीलचेयरवर खेळलो असल्याचे शशांकने सांगितले.
आशियाई स्पर्धेची तयारी सुरू -
शशांकने सांगितले की, पैराबॅडमिंटनच्या ८ राष्ट्रीय आणि एक इंटरनॅशन सामन्यात सहभागी झालो. ज्यामध्ये तीन सिल्वर आणि सात ब्रॉन्ज मेडल जिंकली. आता 2021 मध्ये होणाऱ्या जागितक स्पर्धेत आणि 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवायचे असल्याची भावना व्यक्त केली.
आईचे आनंदाअश्रू
जूने दिवस आठवून आणि मुलाने केलेला संघर्ष बघून शशांकच्या आईला अश्रू अनावर झाले. शशांकला मिठी मारून आईच्या डोळ्यातून आनंदाअश्रू येत होते.