ETV Bharat / sports

सायना-कश्यपची डेन्मार्क ओपनमधून माघार

सायनाच्या या निर्णयानंतर महिला एकेरी गटात भारताकडून कोणीही ही स्पर्धा खेळणार नाही. पी. व्ही. सिंधूने सप्टेंबरमध्ये या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

author img

By

Published : Oct 7, 2020, 3:51 PM IST

saina nehwal and parupalli kashyap withdrew from denmark open
सायना-कश्यपची डेन्मार्क ओपनमधून माघार

नवी दिल्ली - भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुष खेळाडू पारुपल्ली कश्यप यांनी डेन्मार्क ओपनमधून आपली नावे मागे घेतली आहेत. ही सुपर ७५० स्पर्धा १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कच्या ओडेन्स येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेद्वारे कोरोनानंतर बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.

"हो, आम्ही स्पर्धेतून माघार घेतली आहे," असे सायनाने एका वृत्तसंस्थेला सांगितले. सायनाच्या या निर्णयानंतर महिला एकेरी गटात भारताकडून कोणीही ही स्पर्धा खेळणार नाही. पी. व्ही. सिंधूने सप्टेंबरमध्ये या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

पुरुष गटात किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, अजय जयराम आणि शुभांकर डे डेन्मार्क ओपनमध्ये खेळणार आहेत. वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशनने (बीडब्ल्यूएफ) यापूर्वी डेन्मार्क मास्टर्स तसेच थॉमस आणि उबर कप रद्द केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.