बँकॉक - विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुला एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या पहिल्या गटसामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या तैवानच्या ताई जु यिंगने सिंधुचा १९-२१, २१-१२, २१-१७ असा पराभव केला.
मागील आठवड्यात झालेल्या थायलंड ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर सिंधुने शानदार सुरुवात केली होती. मात्र, आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत यिंगने सिंधूवर सरशी साधली.
हेही वाचा - आयसीसीचा नवा पुरस्कार : पाच भारतीय खेळाडूंमध्ये चुरस
सिंधू आणि यिंग २१ वेळा आमने सामने आले होते. यात सिंधुचा हा १६वा पराभव आहे. १५ लाख डॉलर्स बक्षीस रक्कम असलेल्या वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे सिंधुने २०१८मध्ये विजेतेपद जिंकले होते. आलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या सिंधुचा पुढील सामना थायलंडच्या रतचानोक इंतानोनशी होणार आहे.