ETV Bharat / sports

सुवर्ण'सिंधु'ने विश्वविजेते पदानंतर घेतले व्यंकटेश्वराचे दर्शन

author img

By

Published : Aug 30, 2019, 8:03 PM IST

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील विजयानंतर सिंधुवर जगभरातून कौतूकाचा वर्षाव झाला. सुवर्णपदकासह मायदेशात परतलेल्या सिंधूची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यानंतर सिंधुने सहकुटुंबीय दक्षिण भारतातील पवित्र तिरुमाला तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले.

भारताची सुवर्णकन्या सिंधुने दिली दक्षिणेतील सुवर्णमंदिराला भेट

नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुने बासेल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. सतत हुलकावणी देणारे सुवर्णपदक अखेर भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने पटकावले. तिने जपानची खेळाडू नाओमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.

या विजयानंतर सिंधुवर जगभरातून कौतूकाचा वर्षाव झाला. सुवर्णपदकासह मायदेशात परतलेल्या सिंधूची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यानंतर सिंधुने सहकुटुंबीय दक्षिण भारतातील पवित्र तिरुमाला तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने २०१७ च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली.

पी. व्ही. सिंधु

अंतिम सामन्यात सिंधूने जपानची ओकुहारा हिचा २१-७, २१-७ ने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने ४-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतरही हाच धडाका कायम ठेवत तिने पहिला गेम २१-७ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूचाच बोलबाला होता. तिने २-० पासून ५-२, ८-२ असे करत दुसरा गेमही २१-७ ने जिंकला. जागतिक विश्व बॅडमिंटनमध्ये सिंधूने आता एकूण पाच पदके जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य असा समावेश आहे.

भारतीय बॅडमिंटन इतिहासात सिंधू सुवर्ण जिंकणारी पहिलीच खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय सायना नेहवाल हिने २०१५ आणि २०१७ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तर पुरुष गटात प्रकाश पादुकोण यांनी १९८३ तर साई प्रणीत याने २०१९ मध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

Intro:Body:

    World Badminton Champion PV Sindhu has visited Tirumala today. She was offred prayers along with her parents. The priests gave prasaadam and blessed her at the Ranganayaka Mandapam. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.