जकार्ता - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाला. जपानची खेळाडू अकाने यामागुची हिने सिंधूचा 21-15, 21-16 असा पराभव केला. या पराभवाने रिओ ऑलम्पिंक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
-
A memorable week💪
— BAI Media (@BAI_Media) July 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Unforgettable matches😎
And a Silver 🥈Medal👏@Pvsindhu1#Indonesian outing can be summed up pretty much this way.
To many more such successful encounters!👊#IndiaontheRise #badminton pic.twitter.com/j5pWRwb38c
">A memorable week💪
— BAI Media (@BAI_Media) July 21, 2019
Unforgettable matches😎
And a Silver 🥈Medal👏@Pvsindhu1#Indonesian outing can be summed up pretty much this way.
To many more such successful encounters!👊#IndiaontheRise #badminton pic.twitter.com/j5pWRwb38cA memorable week💪
— BAI Media (@BAI_Media) July 21, 2019
Unforgettable matches😎
And a Silver 🥈Medal👏@Pvsindhu1#Indonesian outing can be summed up pretty much this way.
To many more such successful encounters!👊#IndiaontheRise #badminton pic.twitter.com/j5pWRwb38c
सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. यामुळे हा सामना 51 मिनिटे रंगला. मात्र यात सिंधूचा पराभव झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पहिल्या गेममध्ये स्कोर 8-8 असे बरोबरीत होता. त्यानंतर सिंधूने 11-8 अशी बढत घेतली. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत 4 थ्या क्रमांकावर असलेल्या अकाने हिने सिंधूला कोणतेही संधी दिली नाही आणि हा गेम 21-15 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सामन्यात वापसी करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याला आपला पराभव वाचवता आला नाही. ती दुसरा गेम 21-16 ने हरली.
स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत 3 नंबरवर असलेल्या चीनच्या चेन यू फेईचा पराभव केला होता. यामुळे सिंधूचे अंतिम फेरी जिंकण्याच्या आशा वाढल्या होत्या. मात्र अकाने हिने सिंधूचा पराभव करत स्पर्धा जिंकली.