अमरावती - विश्वविजेती भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची आंध्र प्रदेश सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचारविरोधी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक मंगळवारी जाहीर करण्यात आला.
हेही वाचा - क्रिकेटपटू कोहलीच्या 'विराट' ब्रँडने पुमा इंडियाचा स्पोर्ट्सवेअर व्यवसायात षटकार!
याप्रसंगी 'भ्रष्टाचार थांबवा' नावाचा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये लोकांना भ्रष्टाचाराविरुद्ध डोळे आणि कान उघडे ठेवण्यास सांगितले गेले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये सिंधूला उपजिल्हाधिकारी पद देण्यात आले आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर आंध्र प्रदेश राज्यातील तत्कालीन सरकारने सिंधूला तीन कोटी रुपये, अमरावतीमध्ये एक घर आणि वर्ग एक पदाची नोकरी देण्याची घोषणा केली होती.