मुंबई - जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या (बीडब्ल्यूएफ) ‘आय एम बॅडमिंटन’ जागरूकता अभियानासाठी विश्वविजेत्या पीव्ही सिंधूसह आठ खेळाडूंची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. सिंधूखेरीज कॅनडाची मिशेल ली, चीनची झेंग सी वेई आणि हुआंग या केओंग, इंग्लंडची जॅक शेपर्ड, जर्मनीची वॉलेस्का नोब्लाच, हाँगकाँगची चान हो यूएन आणि जर्मनीची मार्क ज्वेलबर यांचा या अभियानात समावेश आहे.
या मोहिमेमध्ये, खेळाडूंना बॅडमिंटन खेळाबद्दल आवड आणि आदर व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जाते. यात ते प्रामाणिकपणाने खेळण्याचा सल्ला देतात.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती २४ वर्षीय सिंधू म्हणाली, की कोणत्याही खेळात प्रामाणिक असणे खूप महत्त्वाचे आहे. जर हे सर्व खेळाडू हे समजावून सांगू शकतील, तर मला वाटते की हा संदेश अधिक खेळाडूंकडे पोहोचेल.