ETV Bharat / sports

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूला थेट प्रवेश नाही - bwf world tour finals 2020

बीडब्ल्यूएफच्या नियमांनुसार यापूर्वी सिंधूला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. पण कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे बीडब्ल्यूएफने यंदा हा नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

No direct entry for pv sindhu in bwf world tour finals
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूला थेट प्रवेश नाही
author img

By

Published : Oct 13, 2020, 3:19 PM IST

नवी दिल्ली - विश्वविजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) या स्पर्धेत सिंधूला प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूने २०१८ बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद जिंकले होते.

बीडब्ल्यूएफच्या नियमांनुसार, यापूर्वी सिंधूला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. पण कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे बीडब्ल्यूएफने यंदा हा नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

बीडब्ल्यूएफने एका निवेदनात म्हटले आहे, की सध्याच्या नियमांनुसार खेळाडूंना बँकॉकमध्ये होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स २०२०साठी पात्र ठरावे लागेल. सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन्संना थेट प्रवेश मिळणार नाही. केवळ वर्ल्ड टूर टूर्नामेंटमध्ये मिळालेल्या गुणांच्या अधारावर प्रवेश दिला जाईल."

सुपर ७५० डेन्मार्क ओपन मंगळवारपासून सुरू होईल. ही स्पर्धा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स २०२०चा भाग आहे. सिंधू आणि सायना या दोघांनी या स्पर्धेतून आधीच नावे मागे घेतली आहेत. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत बँकॉकमध्ये होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.