बर्मिंघहॅम - मलेशियाच्या ली झी जिया याने अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या गतविजेत्या व्हिक्टर अॅक्सलसेनचा पराभव करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एक तास १४ मिनिटे चाललेल्या रोमांचक सामन्यात ली झी याने अॅक्सलसेनला ३०-२९, २०-२२, २१-१९ अशी धूळ चारली.
पहिल्या गेम ली झी जिया याने ३०-२९ ने जिंकला. यानंतर अॅक्सलसेन याने दुसरा गेम २२-२० ने जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ली झी याने २१-१९ अशी बाजी मारत सामन्यासह जेतेपदावर मोहोर उमटवली.
महिला एकेरीत ओकुहाराला विजेतेपद -
जपानची स्टार बॅडमिंटनपटू नोझोमी ओहुहारा हिने ऑल इंग्लंड स्पर्धेचे महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दुसरी मानांकित ओकुहाराने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१२, २१-१६ असा पराभव केला. ओकुहाराने याआधी २०१६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा - ओकुहाराने पटकावलं ऑल इंग्लंड महिला ओपनचे जेतेपद
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात