पॅरिस - सायना नेहवालचे ओरलियान्स मास्टर्स स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. पुरूष दुहेरीत कृष्णा प्रसाद गारागा आणि विष्णूवर्धन गौड पंजाला या जोडीने अंतिम फेरीत धडक दिली होती. पण त्यांना अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
सायनाला डेन्मार्कची लाइन क्रिस्टोफरसेन हिने २८ मिनिटात २१-१७, २१-१७ अशी धूळ चारली.
कृष्णा आणि विष्णूचा अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी या जोडीने पराभव केला. चौथ्या मानांकित इंग्लंड जोडीने ५६ मिनिटात १९-२१, २१-१४, २१-१९ अशा पराभव केला.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डीला थायलंडच्या जे किटथाराकुल आणि रविंडा प्राजोंगजाइ या जोडीने २१-१८, २१-९ ने पराभव केला.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात
हेही वाचा - VIDEO : विजयी फटका खेळताना बॅडमिंटनपटूचे तुटले रॅकेट