ग्वांगजो (दक्षिण कोरिया) - भारतीय खेळाडूंनी कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दमदार सुरूवात केली आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी विजयी सुरुवात करत पुरुष एकेरी गटाची उपउपांत्य फेरी गाठली आहे. मात्र, सौरभ वर्माचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले.
श्रीकांतने ३७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात हाँगकाँगच्या वाँग व्हिन्सेंचा २१-१८, २१-१७ असा पराभव केला. तर समीर वर्माने जपानच्या काझुमसा सकाईवर पहिल्या गेममध्ये ११-८ असे वर्चस्व मिळवले असताना सकाईने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला. त्यामुळे समीरला पुढच्या फेरीत चाल देण्यात आली.
उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या कांता त्सुनेयामाशी होणार आहे. तर समीरपुढे कोरियाच्या किम डाँगहूनचे आव्हान असणार आहे.
भारताच्या सौरभला मात्र पहिल्या फेरीतच स्पर्धेतू बाद होण्याची नामुष्की ओढावली. १ तास १० मिनिटे रंगलेल्या सामन्यात कोरियाच्या डाँगहुनने १३-२१,२१-१२, २१-१३ अशा पराभव केला. महत्वाची बाब म्हणजे, सौरभने पहिला गेम जिंकनही त्याला पराभव पत्कारावा लागला.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
हेही वाचा - कोरिया ओपन : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत, भारताचे आव्हान संपुष्टात
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!