हाँगकाँग - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या चेन लाँगशी सुरू होता. चेन लाँगने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे श्रीकांतला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे.
-
. @srikidambi enters into the semis of #YonexSunrise #HongKongOpenSuper500.
— BAI Media (@BAI_Media) November 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Let's get this one, Champ! 💪#IndiaontheRise #Badminton pic.twitter.com/nJncPP9Wur
">. @srikidambi enters into the semis of #YonexSunrise #HongKongOpenSuper500.
— BAI Media (@BAI_Media) November 15, 2019
Let's get this one, Champ! 💪#IndiaontheRise #Badminton pic.twitter.com/nJncPP9Wur. @srikidambi enters into the semis of #YonexSunrise #HongKongOpenSuper500.
— BAI Media (@BAI_Media) November 15, 2019
Let's get this one, Champ! 💪#IndiaontheRise #Badminton pic.twitter.com/nJncPP9Wur
हेही वाचा - द्विशतकवीर मयांकने मोडला दिग्गज ब्रॅडमन यांचा 'हा' मोठा विक्रम
दुखापत होण्यापूर्वी चेन लाँगला श्रीकांतने पहिल्या गेममध्ये २१-१३ ने मात दिली. श्रीकांतने या स्पर्धेत आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. दुसर्या फेरीत तीन सामन्यांच्या रोमांचकारी सामन्यात त्याने सौरभ वर्माचा २१-११, १५-२१ २१-१९ असा पराभव केला होता.
उपांत्य फेरीत श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या ली च्यूक यू आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा डेन्मार्कचा विक्टर अॅक्सलसेन यांच्यातील विजेत्याशी होईल. श्रीकांत आता या स्पर्धेत एकमेव भारतीय खेळाडू उरला आहे.