मनिला - एशियन टीम चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या इंडोनेशियाकडून भारतीय बॅडमिंटन संघाला पराभव पत्करावा लागला. युवा खेळाडू लक्ष्य सेनने आशियाई चॅम्पियन जोनाथन क्रिस्टीला मात दिली असली तरी, इंडोनेशियाने ३-२ ने भारतावर मात केली. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
हेही वाचा -मँचेस्टर सिटीला २.३२ अब्ज रुपयांचा दंड!
शनिवारी झालेल्या सामन्यात ३१ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने सातव्या मानांकित क्रिस्टीचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दुसर्या सामन्यात बी साई प्रणीतला अँथनी जिटिंगने पहिल्या गेममध्ये ६-२१ ने पराभूत केले. त्याचवेळी दुहेरीत एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांचा १०-२१, २१-१४, २१-२३ असा पराभव झाला.
सारलोरलक्स ओपन चॅम्पियन सुभंकर डे याने शेसर हिरेन रुस्तावितोला २१-१७, २१-१५ असे हरवून २-२ अशी बरोबरी साधली. परंतु, निर्णयाक सामन्यात चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेनला ६-२१, १३-२१ अशी मात खावी लागली.