ETV Bharat / sports

भारताच्या आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूला कोरोनोची लागण - Indiab badminton player corona news

"सिक्की आणि किरण या दोघांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोघे हैदराबादचे असून ते घरून शिबिरात येत होते. अकादमी सॅनिटायझेशनसाठी बंद केली गेली आहे. सिक्की आणि किरण यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यांची पुन्हा आरटी पीसीआय चाचणी केली जाईल", असे प्राधिकरणाने सांगितले.

India's badminton player n. sikki reddy tests positive for coronavirus
भारताच्या आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूला कोरोनोची लागण
author img

By

Published : Aug 14, 2020, 11:05 AM IST

नवी दिल्ली - भारताची महिला बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डी आणि फिजिओथेरपिस्ट किरण सी. यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) गुरुवारी याबाबत माहिती दिली. हैदराबादच्या गोपीचंद अकादमीतील राष्ट्रीय शिबिरात सिक्कीने भाग घेतला होता. सिक्कीच्या चाचणीनंतर, ही अकादमी सॅनिटायझेशनसाठी बंद करण्यात आली आहे.

"सिक्की आणि किरण या दोघांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोघे हैदराबादचे असून ते घरून शिबिरात येत होते. अकादमी सॅनिटायझेशनसाठी बंद केली गेली आहे. सिक्की आणि किरण यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यांची पुन्हा आरटी पीसीआय चाचणी केली जाईल", असे प्राधिकरणाने सांगितले.

राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद म्हणाले, "प्राधिकरणाने राष्ट्रीय शिबिरातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यापैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रोटोकॉलनुसार सर्व नियमांचे पालन केले जाते. जेणेकरून सर्व खेळाडू लवकरात लवकर प्रशिक्षणात परत येऊ शकतील."

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधुव्यतिरिक्त सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, साई प्रणीत, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रेंकीरेड्डी या शिबिरात भाग घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.