बर्मिंगहॅम (इंग्लंड) - ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने तीन खेळाडू आणि एक सहाय्यक कर्मचारीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडला होती. आता पुन्हा त्या खेळाडूंसह भारतीय चमूची चाचणी करण्यात आली. आज चाचणीचे रिपोर्ट समोर आले असून यात ते सर्व जण निगेटिव्ह आहेत. यामुळे खेळाडूंच्या सरावाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजपासून ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच भारताचे तीन भारतीय बॅडमिंटनपटू आणि एक सहाय्यक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच उर्वरित खेळाडूंचे अहवाल येणे बाकी होते. यामुळे खेळाडूंना सरावाची परवानगी देण्यात आलेली नव्हती.
कोरोनाबाधित खेळाडूंची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामुळे खेळाडूंना सरावासाठी परवानगी मिळाली आहे. दरम्यान, या स्पर्धेमध्ये विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूवर भारताची भिस्त आहे. स्विस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरत जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी ती उत्सुक आहे. पहिल्या फेरीत तिचा सामना मलेशियाच्या सोनिया चीह हिच्याशी होणार आहे.
हेही वाचा - गोपीचंद यांचे ज्वाला गुट्टाला उत्तर म्हणाले...
हेही वाचा - भारताच्या माजी बॅडमिंटनपटूला ब्रेन ट्यूमर