हाँगकाँग - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधून हाँगकाँग ओपन स्पर्धेत विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाची किम गा ईयूनचा पराभव केला. या विजयासह सिंधू आता दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे. तर पुरुष एकेरीत भारताच्या एच.एस. प्रणॉयने चीनच्या खेळाडूचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.
३६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने किमचा २१-१५, २१-१६ ने पराभव केला. दरम्यान, चार लाख डॉलर बक्षिस असलेल्या या स्पर्धेत सिंधू दुसऱया फेरीत पोहोचली असून तिचा पुढील सामना थायलंडची बुसानन हिच्याशी होणार आहे.
पुरुष एकेरीत प्रणॉयने चीनच्या हुआंग यू शियांगचा पराभव केला. त्याने ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१७, २१-१७ ने बाजी मारली. दरम्यान, प्रणॉय पुढचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी याच्याशी होणार आहे.
![Hong Kong Open: Sindhu and Prannoy moves into second round with dominant win](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4965978_711309-hs-prannoy-japan-open-2017-afp.jpg)
Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद
Hong Kong Open : श्रीकांत 'या'मुळं सामना न खेळताच दुसऱ्या फेरीत