पॅरिस - जगज्जेती पी. व्ही. सिंधू आणि भारताची दुसरी अव्वल खेळाडू सायना नेहवालचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूचा चीनच्या ताय झू यिंगने, तर सायनाचा कोरियाच्या अॅन से यंगने पराभव केला.
सिंधू आणि सायनाने फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यामुळे भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, दोघींचाही उपांत्य फेरीत पराभव झाला. सिंधूचा १६-२१, २६-२४, १७-२१ अशा फरकाने पराभव झाला. तर ४९ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामना यंगने २२-२०, २३-२१ अशा फरकाने जिंकत सायनाचा पराभव केला.
दरम्यान, सिंधू आणि सायनाच्या पराभवाबरोबर भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सिंधूला एकही स्पर्धेचे विजेतेपद पटकवता आले नाही. तर इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या विजेतेपदानंतर सायनाच्या स्पर्धा विजयाची पाटी रिकामी आहे.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस