ETV Bharat / sports

वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने रद्द केल्या चार स्पर्धा - bwf latest news

बीडब्ल्यूएफचे महासचिव थॉमस लँड म्हणाले, "ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय खेळाडू, प्रेक्षक, स्वयंसेवक आणि सदस्य संघटनांचे आरोग्य लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. स्पर्धा रद्द केल्याबद्दल आम्ही खूप निराश आहोत, परंतु आम्हाला असे वाटते की यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.''

Four bwf tournaments canceled including korea and taipei open
वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने रद्द केल्या चार स्पर्धा
author img

By

Published : Jul 29, 2020, 4:18 PM IST

क्वालालंपूर - वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) कोरोनामुळे कोरीया ओपन आणि तैपेई ओपनसह आपल्या चार स्पर्धा रद्द केल्या आहेत. तैपेई ओपन 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर कोरिया ओपन स्पर्धा 8 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या दोघांव्यतिरिक्त 15 ते 20 सप्टेंबर दरम्यानची चीन ओपन आणि 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणारी जपान ओपनदेखील रद्द करण्यात आली आहे.

बीडब्ल्यूएफचे महासचिव थॉमस लँड म्हणाले, "ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय खेळाडू, प्रेक्षक, स्वयंसेवक आणि सदस्य संघटनांचे आरोग्य लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. स्पर्धा रद्द केल्याबद्दल आम्ही खूप निराश आहोत, परंतु आम्हाला असे वाटते की यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.''

लँड पुढे म्हणाले, "जगभरातील जे लोक मैदानात परत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांची निराशा आम्हाला समजली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे नियम व कायदे पूर्णपणे समजून घेत आमच्या कार्यक्रमांमध्ये बदल करणार आहोत.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.