ETV Bharat / sports

आमच्या कुटुंबात कुठलेही वाद नाहीत; पी.व्ही. सिंधूच्या वडिलांचे स्पष्टीकरण - पी व्ही सिंधू वडिल न्यूज

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी.व्ही.सिंधू सध्या लंडनमध्ये आहे. तिच्या कुटुंबाबाबत सध्या काही बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. त्यावर तिचे वडील पी.व्ही रमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

P V Sindhu
पी व्ही सिंधू
author img

By

Published : Oct 20, 2020, 1:14 PM IST

Updated : Oct 20, 2020, 2:29 PM IST

हैदराबाद - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू कौंटुबिक कारणांमुळे लंडनला निघून गेल्याच्या वृत्ताचे तिचे वडील पी व्ही रमण यांनी खंडन केले आहे. 'गाट्रोड स्पोर्टस् सायन्स इन्सिट्यूट'(जीएसएसआय)मध्ये सिंधू गेली असून त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी एका माध्यमाने बातमी दिली होती की, सिंधू कौंटुबिक वादातून ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबीर अर्ध्यात सोडून लंडनला निघून गेली. त्यानंतर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी सिंधूचे वडील पी.व्ही. रमण यांच्याशी संवाद साधला. त्यांनी माध्यमांचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, सिंधु तिच्या शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करू इच्छिते. त्यामुळे ती लंडनला गेली आहे. जबाबदार माध्यमांनी खोट्या अफवा पसरवणे चुकीचे असल्याचे रमण यांनी सांगितले.

  • I came to London a few days back to work on my nutrtion and recovery needs with GSSI. Infact I have come here with the consent of my parents and absolutely they were no family rifts in this regard. pic.twitter.com/zQb81XnP88

    — Pvsindhu (@Pvsindhu1) October 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये असलेल्या पी व्ही सिंधूने ट्विट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. ती सध्या जीएसएसआयमध्ये असून आहार आणि तंदुरुस्तीवर लक्ष देणार आहे. याबाबत माझ्या पालकांना माहिती आहे, असे तिने म्हटले. तसेच कोणतेही कौटुंबिक वाद नसल्याचे तिने स्पष्ट केले.

जागतिक चॅम्पियन सिंधूने काही दिवसांपूर्वीच डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. जानेवारीमध्ये होणाऱ्या आशिया ओपनमधून ती पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.

Last Updated : Oct 20, 2020, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.