नवी दिल्ली - विश्वविजेती पी. व्ही. सिंधूला, मागील दोन आठवड्यात केलेल्या खराब कामगिरीचा फटका बसला आहे. तिची विश्व रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. मंगळवारी बीडब्ल्यूएफने जारी केलेल्या नव्या रँकिंगनुसार, सिंधूची एका स्थानाची घसरण झाली. ती सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर पारुपल्ली कश्यप चांगली कामगिरीच्या जोरावर टॉप २५ मध्ये सामिल झाला आहे.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूचा चीन ओपन आणि कोरिया ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभव झाला. यामुळे ती पाच महिन्यानंतर टॉप ५ बाहेर पडली आहे. दरम्यान, सिंधूला रँकिंग सुधारण्यासाठी डेन्मार्क आणि फ्रेंच ओपन स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस
पारुपल्ली कश्यपने कोरिया ओपन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. याचा फायदा कश्यपला झाला असून तो ३० व्या स्थानावरुन २५ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर सायना नेहवाल, आठव्या स्थानावर कायम आहे. इतर भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये किदाम्बी श्रीकांत, साई प्रणीत हे १२ व्या स्थानावर आहेत तर समिर वर्मा १७ व्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी