कोपेनहेगन - वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) आपल्या अध्यक्षांचा कार्यकाळ जास्तीत जास्त चार वेळापर्यंत मर्यादित केला आहे. बीडब्ल्यूएफने आपल्या 81 व्या सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेतला. लिगंभावानुसार, प्रत्येकाचे किमान 30 टक्के प्रतिनिधित्व परिषदेत आणि खंड प्रांताच्या प्रतिनिधींमध्ये असेल, असे बीडब्ल्यूएफने घटनेत बदल करताना म्हटले आहे.
बीडब्ल्यूएफचे अध्यक्ष पॉल एरिक होयर यांनी म्हटले, "लिंग समानतेसाठी केलेल्या घटनात्मक बदलांना मान्यता मिळाल्याबद्दल आणि बीडब्ल्यूएफचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी कठोर पाऊल उचलल्याबद्दल मी बीडब्ल्यूएफमधील सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो. "
कोरोना व्हायरसमुळे ही सभा ऑनलाइन घेण्यात आली. बैठकीतील लैंगिक समानतेचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अलीकडील राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांना (एनओसी) दिलेल्या निर्देशानुसार आहे.
कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे बीडब्ल्यूएफने चायना मास्टर्स, स्विस ओपन, युरोपियन चॅम्पियनशिप आणि डच ओपन रद्द करण्याची घोषणा केली आहे.