ETV Bharat / sports

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या प्रणॉयचा ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला धक्का - किदांबी श्रीकांत

दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेला लीन डेन याने पाच वेळा जागतिक चॅम्पियनशिप पटकावली आहे. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने लीन डेनला २१-११, १३-२१, २१-७ गेमने पराभूत केले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या प्रणॉयचा ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला धक्का
author img

By

Published : Aug 20, 2019, 4:09 PM IST

बासेल - स्वित्झर्लंड येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयने दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेल्या चीनच्या लीन डेनला पराभूत केले.

दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेला लीन डेन याने पाच वेळा जागतिक चॅम्पियनशिप पटकावली आहे. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने लीन डेनला २१-११, १३-२१, २१-७ गेमने पराभूत केले. हा सामना प्रणॉयने एक तास आणि दोन मिनिटात जिंकला. आतापर्यंत प्रणॉयने लीन डेनला ३ वेळा पराभूत केले आहे.

यापूर्वी भारताचा आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदांबी श्रीकांत आणि साई प्रणीत यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली होती. तर भारताचा अव्वल खेळाडू समीर वर्मा याला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुहेरीत मेघना जक्कमपुडी आणि एस. पूर्विशा राम या जोडीनेही पहिल्या फेरीत विजय मिळवून दुसरी फेरी गाठली आहे.

Intro:Body:

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या प्रणॉयचा ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला धक्का

बासेल - स्वित्झर्लंड येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयने दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेल्या चीनच्या लीन डेनला पराभूत केले.

दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेला लीन डेन याने पाच वेळा विश्व चॅम्पियनशिप पटकावली आहे. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने लीन डेनला २१-११, १३-२१, २१-७ ने पराभूत केले. हा सामना प्रणॉयने एक  तास आणि दोन मिनिटात जिंकला. आतापर्यंत प्रणॉयने लीन डेनला ३ वेळा पराभूत केले आहे.  

यापूर्वी भारताचा आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदांबी श्रीकांत आणि साई प्रणीत यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली होती. तर भारताचा अव्वल खेळाडू समीर वर्मा याला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुहेरीत मेघना जक्कमपुडी आणि एस. पूर्विशा राम या जोडीनेही पहिल्या फेरीत विजय मिळवून दुसरी फेरी गाठली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.