नवी दिल्ली - इंडिया ओपनचे आयोजन डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीत होऊ शकते, असे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) म्हटले आहे. कोरोनावर नियंत्रण आल्यास आणि शासनाने मान्यता दिल्यास ही स्पर्धा होण्याची शक्यता बीएफआयने वर्तवली आहे.
ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा यापूर्वी मार्चमध्ये खेळली जाणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने भारतीय संघटनेला स्पर्धा होण्याच्या संभाव्य कालावधीबद्दल विचारले होते.
यूएस ओपन निलंबित -
वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) २३ ते २८ जून दरम्यान कॅलिफोर्नियामधील फुलरटन येथे होणाऱ्या यूएस ओपनला स्थगिती दिली आहे. यूएस बॅडमिंटन असोसिएशनशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले.