नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक महासंघाने (आयओसी) भारतावर कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. आयओसीने शुक्रवारी बैठक बोलावून याबाबत निर्णय जाहिर केला. भारत जोवर ऑलिंपिकच्या नियमांचे पालन करण्याची लिखित हमी देत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करू शकणार नाही, असे महासंघाने स्पष्ट केले आहे.
नेमबाजी विश्वकंरडकात ऑलिंपिक महासंघाने भारताला मूळ १६ च्या कोट्याऐवजी १४ च्या कोट्याला अनुमती दिली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेला पाकिस्तानच्या २ पुरुष खेळाडूंना २५ मीटर रॅपिड फायर राउंडसाठी व्हिसा उपलब्ध करुन देण्यात अपयश आले होते. परंतु, निलंबित झालेल्या या खेळाडूंच्या गटात भारताच्या खेळाडूंचा समावेश आहे. यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तान (एनआरएपी) यांनी ऑलिंपिक महासंघाकडे याची तक्रार केली. याची दखल घेत आयओसीने भारतावर कारवाई केली.
आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाजी महासंघाने नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेतील रायफर/पिस्टल २५ मीटर स्पर्धेला ऑलिंपिक स्पर्धेच्या योग्यतेचे ठरवले नाही. भारतात नवी दिल्लीत २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.