मुंबई - गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन मध्ये मनोरंजनसृष्टी पूर्णतः थांबली होती. नंतरच्या काळात पुन्हा जोमाने जम बसविण्याच्या प्रयत्नात असताना मनोरंजनसृष्टीला आता पुन्हा एकदा झटका बसला आहे. महाराष्ट्रात पुन्हा संचारबंदी सुरु आहे पुन्हा एकदा कोरोना मुळे मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. परंतु लॉकडाऊन मध्ये देखील मनोरंजनाचा वसा अविरत सुरु राहणार अशी ग्वाही देत आहे झी मराठी, मनोरंजन थांबलं नाही, थांबणार नाही म्हणत.
जनता कर्फ्यू सारख्या नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी प्रेक्षकांसोबत असणार आहे. कारण त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत. अविरत मनोरंजन करण्याचा वसा घेत झी मराठी तुमचं मनोरंजन करतच राहणार आहे. याची सुरुवात होतेय १८ एप्रिल ला होणाऱ्या "घेतला वसा टाकू नको" आणि "माझा होशील ना" या मालिकांच्या १ तासांच्या विशेष भागापासून. पौराणिक कथा आणि चातुर्मासातले व्रतवैकल्य यावर आधारित 'घेतला वसा टाकू नको' ह्या मालिकेचा "कहाणी गुढीपाडव्याची" चा एका तासाचा भाग दुपारी १२ वा. आणि संध्या. ७ वा. दाखवण्यात येणार आहे. तसेच सोमवार पासून याच मालिकेतून 'रामनवमी' विशेष भाग प्रक्षेपित होतील. या विशेष भागांमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून ते श्रीराम जन्मापर्यंतची रंजक कहाणी दाखवण्यात येणार आहे.
झी मराठी वर सोमवार १९ एप्रिल पासून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवेकोरे भाग बघायला मिळतील. मनू आणि अनिकेत च्या लग्नाचं सत्य विक्षिप्त समर आणि मनूच्या घरच्यांसमोर येईल, ‘पाहिले ना मी तुला’च्या पुढील भागांतून. मोमो सोबत ओमचा साखरपुडा होईल की शकू मावशी रॉकीच्या मदतीने स्वीटू आणि ओम ला एकत्र आणेल हे समजेल ‘येऊ कशी तशी मी नांदायला' मधून.
प्रेक्षकप्रिय ‘माझा होशील ना’ ही मालिका आता एका वेगळ्या वळणार येणार आहे, मनालीवरून परत आल्यावर ब्रह्मे घरावर आणि सई आदित्य समोर अनेक नवीन आव्हाने असणार आहेत, गुलप्रीत हीच बंधू मामाची बायको आहे हे घरातल्या सगळ्यांना कळणार आहे, तसेच दादामामाची बायको सिंधूने घराचा ताबा घेतला आहे. तिकडे जेडीचा आदित्य ग्रुप ऑफ कंपनी वर डोळा आहे. या सर्व आव्हानांना हे कुटुंब कसं सामोरं जाईल हे "माझा होशील ना" मधून उलगडेल. आणि हे भाग १८ एप्रिलला दुपारी १ आणि रात्री ८ वा.प्रसारित होणार आहेत.
‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये सोहमचं खरं रूप आसावरी समोर येईल का ?, कसं सामोरं जाईल ब्रह्मे कुटुंब आणि सई आदित्य समोर आलेल्या संकट आणि आव्हानांना ‘माझा होशील ना’ मालिकेत?. तसेच ‘देवमाणूस’ मध्ये दिव्या डॉ. अजितचं खरं रूप जगासमोर आणेल का? आणि ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता का जाईल विरोधात? तसेच अभिराम वाडा विकायला तयार होईल का?
या सर्व मालिकांतील सर्व प्रश्नांची उत्तरे झी मराठीच्या संबंधित मालिकांमधून दिली जातील त्यामुळेच झी मराठी वाहिनी म्हणतेय, मनोरंजन थांबलं नाही, थांबणार नाही.