ETV Bharat / sitara

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरचे निधन

अभिनेत्री दिव्या भटनागरचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

Divya Bhatnagar
दिव्या भटनागर
author img

By

Published : Dec 7, 2020, 1:35 PM IST

मुंबई: कोविड -१९ आणि न्यूमोनिया झाल्याचे निदान झालेली अभिनेत्री दिव्या भटनागरनचे आज पहाटे रुग्णालयात निधन झाले. तिने ३४ वर्षांची होती. कोविड -१९ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती अधिकच खराब झाल्यावर गेल्या आठवड्यात तिला व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी चांगले उपचार मिळावे म्हणून तिला वेगळ्या रूग्णालयात हलवले होते.

नोव्हेंबरमध्ये दिव्याची आई आणि भाऊ तिची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच ते दिल्लीहून मुंबईला आले होते. अभिनेत्री दिव्याच्या आईने यापूर्वी एका अग्रगण्य वेबलोइडशी बोलताना सांगितले होते की, दिव्याचे लग्न गगन नावाच्या माणसाबरोबर झाले होते आणि त्यामुळे तिला खूप त्रास झाला होता.

हेही वाचा - ख्रिस्तोफर नोलन यांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील डिंपल यांना लिहिलेली चिठ्ठी अक्षयने केली शेअर

कॉमेडी शो तेरा यार हूं मैंच्या सेटवर दिव्या भटनागरला त्रास होऊ लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शोमध्ये तिने रीना अग्रवालची भूमिका साकारली होती.

देवोलिना भट्टाचार्य यांच्यासह तिच्या अनेक सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर दिव्या भटनागरला श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - अभिनेता शेखर सुमन साजरा करणार नाहीत वाढदिवस, कारण...

ये रिश्ता क्या कहलाता है, संस्कार, उडान, जीत गयी तो पिया मोरे यासारख्या टीव्ही मालिकातून भूमिका साकारल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.