ETV Bharat / sitara

लग्नानंतर प्रथमच यामी गौतम धर दिसणार थ्रिलर होस्टेज ड्रामा 'अ थर्सडे'मध्ये! - Yami Gautam Dhar latest news

'अ थर्सडे’ ही थ्रिलर सिरीज डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. बालवाडी शिक्षिका नयना जयस्वाल अचानक एके दिवशी तिच्या विद्यार्थ्यांना ओलीस ठेवते आणि लहान मुलांच्या हसण्याने आणि निरागसते भरलेल्या बालवाडीतील वातावरण एका थरारनाट्यात बदलून जाते. नयनाने एवढे कठोर पाऊल का उचलले असेल व तिचे अंतिम उद्दिष्ट काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल की तिच्यावर कारवाई होईल हे 'अ थर्सडे’ मधून समोर येईल.

यामी गौतम धर
यामी गौतम धर
author img

By

Published : Feb 12, 2022, 12:23 PM IST

मुंबई - जेव्हा एखादा गुन्हेगार निष्पाप लोकांचे जीव धोक्यात घालतो तेव्हा एखादा गुरुवार घातवार ठरतो. काय होईल जर एखाद्या बालवाडी शिक्षिकेने अचानक बंदुक बाहेर काढली आणि तिथल्या मुलांना ओलीस ठेवले? बालवाडी शिक्षिका नयना जयस्वाल अचानक एके दिवशी तिच्या विद्यार्थ्यांना ओलीस ठेवते आणि लहान मुलांच्या हसण्याने आणि निरागसते भरलेल्या बालवाडीतील वातावरण एका थरारनाट्यात बदलून जाते. नयनाने एवढे कठोर पाऊल का उचलले असेल व तिचे अंतिम उद्दिष्ट काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल की तिच्यावर कारवाई होईल हे 'अ थर्सडे’ मधून समोर येईल. 'अ थर्सडे’ मधून मानवी स्वभावाची काळी बाजू, घटनांची अनपेक्षित वळणे आणि गुप्त योजना उघड केल्या जातील.

'अ थर्सडे’ मध्ये यामी गौतम धर बालवाडी शिक्षिका नयना जयस्वाल च्या भूमिकेत दिसणार असून तिने पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारली आहे. यामी या चित्रपटात संपूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अनपेक्षित ट्विस्ट्स आणि सस्पेंसफूल वळणावरून प्रवासाला घेऊन जाईल. ‘अ थर्सडे' ची गुंतागुंत आणि मंत्रमुग्ध करणारी कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

डिज्नी+ हॉटस्टार वर ही सिरीज प्रदर्शित होणार असून नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अनेक ब्लॉकबस्टर हिट्सनंतर, डिज्नी+ हॉटस्टार 'अ थर्सडे' सह पुन्हा एकदा प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज झाला आहे. सस्पेन्स आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला, 'अ थर्सडे' शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. बेहजाद खंबाटा दिग्दर्शित, या चित्रपटात यामी गौतम धर आणि दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया, नेहा धुपिया, अतुल कुलकर्णी असे मातब्बर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा - मी विचाराने आणि मनाने रणबीरसोबत आधीच लग्न केले आहे आलिया भट्ट

या चित्रपटात नयना जयस्वालची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री यामी गौतम धर म्हणाली, “मी या आधी नयनासारखी वेगळी भूमिका कधीच साकारली नव्हती. ती खूप वैविध्यपूर्ण भावनांना प्रगट करते. या व्यक्तिरेखेच्या विविध छटा दर्शविण्यासाठी मी खरोखर खूप प्रयत्न केले आहेत. ती एक शिक्षिका आहे जी नेहमीच मुलांची काळजी घेते पण आता तिने त्यांना ओलीस ठेवले आहे. परिस्थिती तणावपूर्ण आहे परंतु त्याला अनेक पदर आहेत. ‘अ थर्सडे’ हा रोलर कोस्टर राईडसारखा आहे आणि मला याचा भाग होताना आनंद होतो आहे."

प्रतिभावान अभिनेता अतुल कुलकर्णीने सांगितले की, "या चित्रपटात मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे आणि जो नयनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. पटकथेतील सस्पेन्स आणि चित्रपटाला आकार देणारे ट्विस्ट प्रेक्षकांना रोमांचित करतील. यातील अनपेक्षित पैलू समोर आल्यावर अधिकारी आणि गुन्हेगार यांच्यातील लढाई वेगळ्या स्तरावर जाते. संपूर्ण युनिटने उत्तम काम केले आहे आणि आम्ही प्रेक्षकांना हा चित्रपट दाखवण्यासाठी उत्सुक आहोत."

बेहझाद खंबाटा दिग्दर्शित, यामी गौतम धर, डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी अभिनीत 'अ थर्सडे' ची निर्मिती केली आहे आरएसवीपी मूवीज़ आणि ब्लू मंकी फिल्म्सने आणि येत्या १७ फेब्रुवारी २०२२ पासून डिज्नी+हॉटस्टार वर तो उपलब्ध होईल. 'अ थर्सडे' हुलुवर देखील उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा - Ipl Auction: शाहरुखचा प्रतिनिधी म्हणून आर्यन खान हजर, सुहानाचे पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.