मुंबई - सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मुंबईतील आपल्या घरातून गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाटणा येथे तिच्या विरोधात सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर बिहार पोलीस रियाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
दिवंगत सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांनी एफआयआरमध्ये केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी पाटण्यातील चार सदस्यांची पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली. तथापि, बिहार पोलिसांची टीम रियाच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा त्यांना ती तेथे सापडली नसल्याची माहिती आहे.
पाटणाच्या राजीव नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी योगेंद्र रविदास यांनी मंगळवारी सांगितले की सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी आपल्या तक्रारीत रिया चक्रवर्तीसह सहा जणांवर आत्महत्येचा आरोप केला आहे (एफआयआर क्रमांक 241/20). "
सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि अन्य पाच जणांवर आयपीसी कलम 340, 341, 380, 406, 420 आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पाटणा मध्यवर्ती विभागाचे आयजी संजय कुमार यांनी पाटण्यात पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची पाटण्यातही होऊ शकते चौकशी?
वृत्तानुसार, सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रियावर दाखल केलेल्या एफआयआरविरूद्ध ती अग्रिम जामीन दाखल करण्याचा विचार करीत आहे आणि त्यामुळे ती पोलिसांच्या संपर्कात येत नाही.
सुशांतसिंह राजपूतचे निधन होईपर्यंत रिया आणि त्याचे प्रेमसंबंध होते. दोघेही लवकरच लग्नगाठ बांधण्याचा विचार करीत होते. तथापि, 14 जून रोजी सुशांत यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या पोस्टमार्टम अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे वर्णन आहे.