ETV Bharat / sitara

छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा 'शिवा काशिद' साकारतोय विशाल निकम - जय भवानी जय शिवाजी मालिका

शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हटलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद साकारतोय विशाल निकम!

author img

By

Published : Jul 19, 2021, 5:39 AM IST

छत्रपती शिवाजी महाराज या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी मालिका म्हणजे ‘जय भवानी जय शिवाजी’. छत्रपतींच्या जिगरबाज मावळ्यांपैकी एक म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हटलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेतोजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर साकारणार असून अभिनेता विशाल निकम शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘याआधी स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आता जय भवानी जय शिवाजीमध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.’

विशाल पुढे म्हणाला, ‘स्वराज्य हे एकचं स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असं म्हटलं तरी चालेल. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे.’

नवी ऐतिहासिक मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ प्रसारित होणार आहे २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.