ETV Bharat / sitara

विशाखा सुभेदारच्या 'स्वामिधाम कलाश्रय'मध्ये बुजुर्ग कलावंतांना मिळणार मायेची सावली - film industry

याप्रसंगी बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या, की ‘अभिनय आणि सामजिक कार्य यांची सांगड घालत समाजासाठी विशेषतः कलाकारांसाठी भरीव काहीतरी करण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं

विशाखा सुभेदारनं सुरू केला वृध्दाश्रम
author img

By

Published : Apr 10, 2019, 2:24 PM IST

मुंबई - कलाकार आपल्या आविष्कारातून प्रेक्षकांना आनंद देत असतो. हाच आनंद कलाकारांना त्यांच्या उतारवयात मिळावा यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘स्वामीधाम कलाश्रय’ची संकल्पना मांडत ती प्रत्यक्षात उतरवली आहे. नुकतीच तिने बुजूर्ग कलाकारांना त्यांच्या उतारवयात सांभाळणारा एक वृद्धाश्रम सुरू करणार असल्याची घोषणा तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून केली होती. तिच्या या कल्पनेला अनेक कलाकारांनी दाद दिली होती.

आता नववर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘स्वामीधाम कलाश्रय’ या वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच रोवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. ‘स्वामीधाम कलाश्रय’ संस्थेचे सर्वेसर्वा चिंतामणी रहातेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अभिनेते पंढरीनाथ कांबळे, सुशील इनामदार, निरंजन कुलकर्णी तसेच या संस्थेच्या कामासाठी विशाखा सुभेदार यांच्या पाठीशी असणारे महेश सुभेदार, जगदीश हडप, निलेश आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या, की ‘अभिनय आणि सामजिक कार्य यांची सांगड घालत समाजासाठी विशेषतः कलाकारांसाठी भरीव काहीतरी करण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ‘स्वामीधाम कलाश्रय’ ची कल्पना सुचली आणि स्वामींच्याच इच्छेने चिंतामणी रहातेकर काका यांचा सहकार्याचा हात आणि अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळाले. आता मी हाती घेतलेल्या या कामासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणारी, या कलाश्रयसाठी झटणाऱ्या कलाकार मंडळीं व जनसामान्यांची साथ मला हवी आहे. सामाजिक कर्तव्यभावनेतून या उपक्रमाला अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन विशाखा यांनी याप्रसंगी केले.

Intro:कलाकार आपल्या आविष्कारातून प्रेक्षकांना आनंद देत असतो. हाच आनंद कलाकारांना त्यांच्या उतारवयात मिळावा यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘स्वामीधाम कलाश्रय’ची संकल्पना मांडत ती प्रत्यक्षात उतरवली आहे. नुकतीच तिने बुजुर्ग कलाकारांना त्यांच्या उतारवयात सांभाळणाऱ्या एक वृद्धाश्रम सुरू करणार असल्याची घोषणा तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून केली होती. तिच्या या कल्पनेला अनेक कलाकारांनी दाद दिली होती.

मात्र नववर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘स्वामीधाम कलाश्रय’ या वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच रोवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. ‘स्वामीधाम कलाश्रय’ संस्थेचे सर्वेसर्वा श्री.चिंतामणी रहातेकर काका यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अभिनेते पंढरीनाथ कांबळे, सुशील इनामदार, निरंजन कुलकर्णी तसेच या संस्थेच्या कामासाठी विशाखा सुभेदार यांच्या पाठीशी असणारे महेश सुभेदार, जगदीश हडप, निलेश आंबेकर आदि असंख्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या की, ‘अभिनय आणि सामजिक कार्य यांची सांगड घालत समाजासाठी विशेषतः कलाकारांसाठी भरीव काहीतरी करण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ‘स्वामीधाम कलाश्रय’ ची कल्पना सुचली आणि स्वामींच्याच इच्छेने चिंतामणी रहातेकर काका यांचा सहकार्याचा हात व अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळाले. आता मी हाती घेतलेल्या या कामासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणारी, या कलाश्रयसाठी झटणाऱ्या कलाकार मंडळीं व जनसामान्यांची साथ मला हवी आहे. सामाजिक कर्तव्यभावनेतून या उपक्रमाला अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन विशाखा यांनी याप्रसंगी केले.

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज, आनंदवाडी, कर्जत येथे या ‘स्वामीधाम कलाश्रय’ वृद्धाश्रमासाठी जागा मिळाली आहे. या मान्यताप्राप्त संस्थेच्या अन्नछत्राचे उद्घाटन झाले असून भविष्यात ‘स्वामीधाम कलाश्रय’ या नावाला साजेसे नाट्य कार्यशाळा, वाचनालय, बागकाम, स्विमिंग पूल, परफॉर्मिंग हॉल, विविध खेळ, विरंगुळा असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्यासाठीच कलाकारांच्या व रसिकांच्या सहकार्याची गरज आहे. या उपक्रमासाठी आवश्यक त्या कायदेशीरबाबींची पूर्तता सुरु असून vish22377@gmail.com या ईमेलआयडीवर संपर्क साधून या उपक्रमाला आर्थिक पाठबळ व नियोजनाच्या काही सूचना असल्यास त्या कळविण्याची विनंती विशाखा सुभेदार यांनी कलाकार व रसिकांना केली आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.