मुंबई - कॉमेडियन कुणाल कामराने विमान प्रवासात अर्णब गोस्वामीला प्रश्न विचारत भंडावून सोडले होते. आपल्या स्टुडिओत आलेल्या पाहूण्यांना आक्रमकपणे प्रश्न विचारणारा, संतापणारा अर्णब कुणालच्या प्रश्नावर मौन बाळगून होता. कुणालने त्याला गप्प केल्याने अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. कुणालच्या या कृतीचे गली बॉय चित्रपटाचा अभिनेता विजय वर्माने कौतुक केले आहे. त्याने कॉमेडियन कुणाल कामराचे आभार मानले आहेत. छळ करणाऱ्या अर्णब गोस्वामीला गप्प केल्याबद्दल कुणालचे कौतुक विजयने केलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विजयने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलंय, ''कुणाल कामरा, आर्णबच्या दुर्मिळ दृश्याची पर्वणी दिल्याबद्दल, तुला धन्यवाद. त्याच्यात तो बरळण्याऐवजी गप्प बसलेला पाहायला मिळाला.''
केवळ विजय वर्माच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या याच भावना आहेत. टायगर श्रॉफ, रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी विजयच्या पोस्टला लाईक केले आहे.
-
Airlines seem to have suddenly turned into headmasters. Dear God whatever next ...
— Soni Razdan (@Soni_Razdan) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Airlines seem to have suddenly turned into headmasters. Dear God whatever next ...
— Soni Razdan (@Soni_Razdan) January 29, 2020Airlines seem to have suddenly turned into headmasters. Dear God whatever next ...
— Soni Razdan (@Soni_Razdan) January 29, 2020
दरम्यान आलिया भट्टची आई अभिनेत्री सोनी राजदान यांनी चार विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर भडकलेल्या दिसल्या.
मुंबई ते लखनौ या मार्गावरील इंडिगो कंपनीच्या विमानतून कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी प्रवास करीत होते. यावेळी कुणालने काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न अर्णबला केला. यावेळी अर्णब कोणतेही उत्तर न देता मौन बाळगून होता. त्याच्या बातमी देण्याच्या पद्धतीवरुन कुणाल त्याला प्रश्न विचारताना दिसला. याचा व्हिडिओ कुणालने सोशल मीडियावर शेअर केला आणि तो आता व्हायरल झालाय.