मुंबई - अभिनेता विजय वर्मा 'गली बॉय' चित्रपटामुळे रातोरात चर्चेत आला. आता नेटफ्लिक्सच्या 'शी' या वेब सिरीजमध्ये झळकला आहे. याची कथा इम्तियाज अलीने लिहिली आहे. या कथेचा भाग बनल्याचा विजयला आनंद झालाय.
विजय वर्मा म्हणाला, ''इम्तियाज अलीसोबत काम करण्यास मिळाल्यामुळे आनंदित आहे. याची कथा खूप समृध्द आणि गंभीर होती. मला वाटते इम्तियाज अलीचे हे नवेच रुप होते. त्यांच्याकडे सांगण्यासाठी अजूनही खूप गोष्टी आहेत. आतापर्यंतच्या कथांपैकी ही अनोखी कथा आहे.''
या वेब सिरीजमध्ये ड्रगच्या सौदागराचा पर्दापाश करण्यासाठी एक महिला कॉन्स्टेबल वेश्येचे रुप घेते.
आपल्या व्यक्तीरेखेबद्दल बबोलताना विजय वर्मा म्हणाला, ''मी सस्या नावाची व्यक्तीरेखा करतोय. खरंतर याचे खरे नाव काय आहे हा चर्चेचा विषय आहे. तो एका रहस्यमय पध्दतीने काम करतो. तो एक अतिशय सिक्रेट व्यवसाय करतो. म्हणून त्याचे व्यक्तीमत्वही गोपनिय आहे. याची अविश्वसनियता खूप आकर्षक आहे. तो एका विभागाचा आहे आणि तिथलीच भाषा बोलतो. या व्यक्तीरेखेचा सर्वात सुंदर भाग या शोमध्ये सरप्राईज आहे.''
या वेब सिरीजमध्ये अदिती पोहनकरचीही महत्त्वाची भूमिका आहे. अविनाश दास आणि अरिफ अली यांचे दिग्दर्शन असलेली ही सिरीज २० मार्चपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.