मुंबई - अभिनेत्री विद्या बालन आता निर्माती बनली आहे. विद्याने 'नटखट' नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. ही शॉर्ट फिल्म येत्या २ जूनला 'वी आर वन : अ ग्लोबल फेस्टिवल'मध्ये प्रदर्शित होणार आहे.
विद्या म्हणाली, कोव्हिड १९ मुळे जगभरातील फिल्म फेस्टीव्हल रद्द झाले आहेत. अशावेळी 'वी आर वन' सारखे डिजीटल प्लॅटफॉर्म फिल्ममेकर्ससाठी आशादायक ठरत आहे. या प्लॅटफॉर्मवर माझी शॉर्ट फिल्म आणून मला आनंद झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सध्याच्या परिस्थितीत आवश्यक अशा विषयावर 'नटखट' शॉर्ट फिल्म आधारित आहे. 'नटखट' फिल्ममध्ये लैंगिक असमानता, दुष्कर्म संस्कृति आणि घरेलू हिंसा या मुद्द्यांना हात घालण्यात आला असून आजच्या काळासाठी हा आवश्यक विषय आहे.आम्ही यातून जगाला एक संदेशही दिलाय. डिजीटल प्लॅटफॉर्मवरील हा महोत्सव यू-ट्यूब चॅनलवर १० दिवस आयोजित करण्यात आलाय. यात मुंबई फिल्म फेस्टीव्हलशिवाय बर्लिन, कान, वेनिस, टोरंटो, न्यूयॉर्क, बीएफआई लंदन, कालोर्वी वैरी, लोकार्नो येथील फिल्म्स सहभागी होत आहेत.
शॉर्ट फिल्म 'नटखट'ची कथा अनुकम्पा हर्ष आणि शान व्यास यांनी लिहिली आहे. विद्या याची निर्माती असून यातील महत्त्वाची भूमिकाही ती साकारत आहे.