विद्या बालन लवकरच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हा बोयोपिक वेब सिरीजच्या माध्यमतून लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. विद्या या बायोपिकसाठी इतकी समर्पित झाली आहे, की तिने दुसरे कोणतेही काम हाती घेतलेले नाही.
विद्या बालन ही इंडस्ट्रीमधील सर्वांमध्ये सहज वावरणारी अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर कोणतीही व्यक्तीरेखा ती लीलाया पेलत असते. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक तिच्या नावासाठी आग्रही असतात. मात्र, असे समजते की तिने इंदिरा गांधींच्या बायोपिक शिवाय दुसरे कोणतेच काम स्वीकारलेले नाही.
इंदिरा गांधी यांच्यावरील बायोपिक सिरीज सागरिका घोष यांच्या 'इंदिरा: इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित आहे.