आपला देश संगीतप्रेमी आहे तसेच संगीत लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीतामधून अनेक भावना व्यक्त होतात आणि संगीतामध्ये आपला मूड बदलण्याची क्षमता आहे. संगीताशिवाय जीवनाला काय अर्थ आहे, या प्रश्नाचा संबंध कोरोनासारख्या अवघड काळात अधिक उठून दिसला. एमटीव्ही हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा ‘युथ एंटरटेन्मेंट ब्रॅण्ड‘ भारताचे सर्वात मोठे शैक्षणिक व्यासपीठ अनअकॅडमीच्या सहयोगाने एक नवीन शो येतोय, 'अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही'.
सोनू निगम, मोनाली ठाकूर, रोचक कोहली, असीस कौर, कैलाश खेर, बादशाह, दर्शन रावल, लकी अली, अर्जुन कानुंगो, बेनी दयाल, पापोन, अरमान मलिक- अमाल मल्लिक, हर्षदीप कौर, स्नेहा खानवलकर, आस्था गिल, रीत तलवार, लिजो आणि किंग यासारखे अत्यंत प्रतिभावान संगीतकार उपस्थित राहून या शोची शोभा द्विगुणित करणार आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये विविध संगीतशैलींना दर्शविण्यात येईल आणि ते सर्व त्यांच्या मधुर आवाजांसह संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करतील.
-
Ab musical Fridays ko bolo hello with your favourite singers and musicians!#UnacademyUnwind with MTV starts 13th Aug, Friday 7 PM on MTV & catch the episodes and songs anytime on youtube @UnacademyUnwind channel#HitPlayToUnwind @unacademy pic.twitter.com/Qy4ji5uKCQ
— MTV India (@MTVIndia) August 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ab musical Fridays ko bolo hello with your favourite singers and musicians!#UnacademyUnwind with MTV starts 13th Aug, Friday 7 PM on MTV & catch the episodes and songs anytime on youtube @UnacademyUnwind channel#HitPlayToUnwind @unacademy pic.twitter.com/Qy4ji5uKCQ
— MTV India (@MTVIndia) August 10, 2021Ab musical Fridays ko bolo hello with your favourite singers and musicians!#UnacademyUnwind with MTV starts 13th Aug, Friday 7 PM on MTV & catch the episodes and songs anytime on youtube @UnacademyUnwind channel#HitPlayToUnwind @unacademy pic.twitter.com/Qy4ji5uKCQ
— MTV India (@MTVIndia) August 10, 2021
शोचा भाग असण्याबाबतचा आनंद व्यक्त करत संगीत उस्ताद सोनू निगम म्हणाला, ''मी या शोसाठी केलेली संकल्पना माझ्या स्वत:करिता अनपेक्षित व अद्वितीय आहे. सर्व परफॉर्मन्स माझ्यासाठी सर्वांगीण आहेत, जेथे प्रत्येक सादरीकरणामधून स्वत:ची अद्वितीय क्षमता दिसून येते. माझ्या मते, कला ही त्या विशिष्ट कलाकाराच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. संगीत हे माझ्या या विश्वासाला दुजोरा देते. 'अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही' हा शो प्रत्येक कलाकाराची वैयक्तिक संगीत क्षमता व तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. माझ्यासाठी हा समाधानकारक अनुभव आहे.''
शांतचित्त संगीत ते उत्साही बीट्सपर्यंत 'अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही'मध्ये प्रत्येक संगीतप्रेमीसाठी पॉवर-पॅक लाइन-अप आहे. लकी अली यांचे सर्वोत्तम 'वर्ल्ड फ्यूजन' सादरीकरण तुमचे लक्ष वेधून घेईल, बादशाह यांची आस्था गिल व रीत तलवार यांच्यासोबतची ग्रूव्ही हिप हॉप लाइन-अप तुम्हाला थिरकण्यास भाग पाडेल. रोमांसप्रेमी दर्शन रावल यांच्या प्रेमळ 'लव्ह ट्रॅप' सादरीकरणासह घायाळ होतील आणि अर्जुन कानुंगो व बेनी दयाल अनुक्रमे 'फ्यूचर पॉप' व 'बॉली फंक' या त्यांच्या व्हर्जन्ससह मंत्रमुग्ध करतील.
संगीत सम्राट लकी अली म्हणाले, ''आम्हाला एकमेकांसोबत विचार करण्याची संधी मिळाली. आमच्यापैकी अनेकांनी एकमेकांसोबत पहिल्यांदाच काम केले, जसे तमारा, इजिप्तमधून ३ संगीतकार आले होते, तसेच दिल्ली व धर्मशालामधून शिवम आणि सरोदवाद्यक यश हे देखील होते. नेहमीप्रमाणे हे अत्यंत व्यावसायिकरित्या करण्यात आले. आकर्षक प्रकाशयोजना व व्यापक मुभेसह हा अत्यंत दिमाखदार शो आहे. माझ्यासाठी हा अत्यंत उत्तम अनुभव होता. विभिन्न शैलीचे कलाकार, नवीन कलाकारांसोबत नात्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. ही संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान मानतो.''
मोनाली ठाकूर, हर्षदीप कौर आणि असीस कौर यांच्यासोबतच्या फोक सहयोगाच्या माध्यमातून रोचक कोहली मेलोडिक सरप्राईज देतील. सुरेल गायक पापोन 'ओल्ड स्कूल जॅझ' या आयकॉनिक क्लासिक्सच्या त्यांच्या अद्वितीय ट्विस्टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, तर सोनू निगम त्यांच्या विविध शैलींमधील 'ऑर्केस्ट्रा' टचसह संगीतमय पर्वणी देतील. अरमान मलिक व अमाल मलिक यांचे 'लव्ह बॅलॅड्स' निश्चितच संगीतप्रेमींच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करेल. कैलाश खेर त्यांच्या २ सर्वात हिट गाण्यांचे रिक्रिएशन व स्नेहा खानवलकर यांच्यासोबत सुरेख सहयोगासह प्रेक्षकांना 'सोल ट्रिप'वर घेऊन जातील.
येत्या १३ ऑगस्ट पासून दर शुक्रवारी प्रसारित होणा-या या शोमध्ये १० एपिसोड्स, १० संगीतशैली आणि मंत्रमुग्ध होण्याच्या अविरत कारणांच्या माध्यमातून काही सर्वात निपुण संगीतकार एकत्र येऊन जादुई रचना निर्माण करताना पाहायला मिळतील. ‘अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही' हा संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांना मधुमरय संगीत राइडवर घेऊन जाईल.
हेही वाचा - सहदेवसोबत रॅपर बादशाहने प्रदर्शित केली "बचपन का प्यार" गाण्याची नवी आवृत्ती