ETV Bharat / sitara

आता निलेश साबळे म्हणणार 'लाव रे तो व्हिडिओ', 'हे' आहे निमित्त - new show on zee yuva

अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, अशा टॅलेंटचा सध्या शोध सुरू आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक खास सरप्राईजसुद्धा आहे. निलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होऊन तुमच्या टॅलेंटवर त्यांची आवड निवड सांगणार आहे.

nilesh sabale upcoming show
निलेश साबळे म्हणणार 'लाव रे तो व्हिडिओ',
author img

By

Published : Jun 19, 2020, 6:02 PM IST

मुंबई - झी युवा' वाहिनी म्हणजे निखळ मनोरंजन हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका, फूल ऑन मनोरंजन करणारे कथाबाह्य कार्यक्रम, यांची रेलचेल या वाहिनीवर नेहमी पाहायला मिळते. अशात आता लॉकडाऊनच्या काळात घरी बसून आपण सर्व कंटाळलो आहोत आणि म्हणूनच 'झी युवा' आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे, एक नवाकोरा कार्यक्रम. 'लाव रे तो व्हिडिओ' असे नाव असलेल्या या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके संयोजक डॉ. निलेश साबळे.

महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. घरबसल्या अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी 'झी युवा'मुळे महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना मिळणार आहे. 'झी मराठी' वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या अप्रतिम कार्यक्रमाचे सूत्रधार डॉक्टर निलेश साबळे आता 'झी युवा' वाहिनीवरसुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, अशा टॅलेंटचा सध्या शोध सुरू आहे . या कार्यक्रमाचं आणखी एक खास सरप्राईजसुद्धा आहे. निलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होऊन तुमच्या टॅलेंटवर त्यांची आवड निवड सांगणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं, तर 'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांसाठी एक झकास एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन येत आहे.

लॉकडाऊनमुळे आलेला कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. 'लाव रे तो व्हिडिओ' या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेटवर अड्कले होते, त्याला आता लाखो करोडोंसमोर टीव्हीवर वाट मिळणार आहे. एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे, या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.