ETV Bharat / sitara

राजेश खन्नांच्या जन्मदिनीच ट्विंकलचा वाढदिवस, शेअर केला वडिलांसोबतचा फोटो - अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना,

ट्विंकल खन्ना हिने आपला वाढदिवस वडिल राजेश खन्ना यांच्या वाढदिवसासोबत साजरा केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक वडिलांसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करुन भावनिक पोस्ट लिहिली आहे. ट्विंकल आणि राजेश खन्ना यांचा जन्मदिन २९ डिसेंबरच आहे.

Rajesh Khanna
राजेश खन्नांच्या जन्मदिनीच ट्विंकलचा वाढदिवस
author img

By

Published : Dec 29, 2020, 5:01 PM IST

मुंबई - अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना, ज्यांनी आपला वाढदिवस वडील राजेश खन्ना यांच्याबरोबर शेअर केला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहित दोन जुने फोटो शेअर केले आहेत.

ट्विंकलने आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तिचे वडिल तिला कसे टिना बाबा म्हणायचे इथपासून ते तिचे संगोपन इतर मुलांहून कसे वेगळे होते याबद्दलही लिहिलंय.

Twinkle Khanna
ट्विंकल खन्ना इन्स्टा पोस्ट

ट्विंकलसाठी फादर डे नेहमीच डिसेंबरमध्येच येतो. तिच्या वाढदिवशीच तिच्या वडिलांचाही जन्मदिन असतो. या योगायोगामुळे तिचा फादर्स डे २९ डिसेंबरलाच असतो. आपल्या आयुष्यात पत्नी डिंपल कपाडियांकडून मिळालेली ट्विंकलही ही सर्वात अनमोल भेट असल्याचे राजेश खन्ना म्हणाले होते.

“त्यांनी मला नेहमी टीना बाबा म्हटले, कधी बेबी म्हटले नाही, आणि मला त्या क्षणी ते कळले नव्हते तरी पण माझे पालनपोषण माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व तरुण मुलींपेक्षा वेगळे होते,” असे दिवंगत सुपरस्टारच्या मुलीने लिहिले आहे.

राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर, १९४२ रोजी अमृतसर येथे झाला आणि त्यांनी १९६६ मध्ये रिलीज झालेल्या आखरी खत चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राजेश खन्ना यांनी १०६ चित्रपटात एकटा नायक म्हणून चित्रपट गाजवले होते. १८ जुलै २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले.

हेही वाचा - शाहिद आणि विजय सेतुपती करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.