ETV Bharat / sitara

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!' मालिकेतील अंजली जोशी म्हणाल्या... - etv bharat marathi

एकत्र कुटुंब पद्धती लोप पाऊ लागली आणि एकलं कुटुंब पद्धती अवलंबिली जाऊ लागली. प्रत्येक कुटुंब पद्धतीत काहींना काही त्रुटी असल्या तरी एकत्र कुटुंब पद्धतीतील जेष्ठांचा अनुभव आणि जिव्हाळा तरुणाईला पुन्हा तिथे ओढतोय.

anjali joshi
अंजली जोशी
author img

By

Published : Oct 14, 2021, 4:54 AM IST

मुंबई - गेल्या काही दशकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती लोप पाऊ लागली आणि एकलं कुटुंब पद्धती अवलंबिली जाऊ लागली. प्रत्येक कुटुंब पद्धतीत काहींना काही त्रुटी असल्या तरी एकत्र कुटुंब पद्धतीतील जेष्ठांचा अनुभव आणि जिव्हाळा तरुणाईला पुन्हा तिथे ओढतोय. एकत्र कुटुंबपद्धतीला पुन्हा एकदा फोकस मध्ये आणणारी मालिका म्हणजे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

या मालिकेतल्या मोठ्या बाई म्हणजे प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आई, जाऊ, सून आणि एक उत्तम अन्नपूर्णा. या मालिकेतील इतर व्यक्तिरेखांप्रमाणेच मोठी बाई ही भूमिका देखील गाजतेय. ही भूमिका अभिनेत्री अंजली जोशी अगदी चोख बजावत आहेत. या मालिकेत एकत्र कुटुंबपद्धती खूप सुंदररित्या दाखवण्यात आली आहे. एकत्र कुटुंबपद्धती बोलताना स्वतःच्या खाजगी आयुष्यातील अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, "मी लग्नानंतर एकत्र कुटुंबात आले आणि मालिके प्रमाणेच मी खऱ्या आयुष्यात देखील मोठी जाऊ आहे. माझ्या लग्नाच्या एका वर्षभरात २ लहान जावा देखील कुटुंबात आल्या. त्यामुळे सासू सासरे, मी माझे पती आणि माझे २ दीर आणि जावा असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो.”

सेटवरील त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलताना अंजली म्हणाल्या, "आम्ही सेटवर सर्वजण मिळून खूप धमाल करतो. मला सगळे मोठ्या बाईच म्हणतात. आम्हा देशमुख सुनांचे स्वयंपाकघरात खूप सिन शूट झाले आहेत. आम्ही तिथे पाककला करतो. एकदा आम्ही संपूर्ण युनिटसाठी शिरा केला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला होता. इथे आम्ही कुटुंबाप्रमाणेच सगळे एकमेकांना सांभाळून घेतो. आम्ही नाशिकमध्ये शूटिंग करतोय. बरेच जण नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि आपल्या कुटुंबापासून दूर आहेत पण आम्ही इथे सगळे एका कुटुंबाप्रमाणेच गुण्यागोविंदाने राहतो."

अंजली जोशी पुढे म्हणाल्या की, “मालिकेप्रमाणेच माझं स्वतःचं कुटुंब खूप गोड आणि प्रेमळ आहे. आम्ही सर्व जावा जवळपास एकाच वयाच्या त्यामुळे आमच्यातील बॉण्डिंग देखील खूप छान आहे. नंतर मुलं मोठी झाल्यामुळे जागेअभावी आम्ही वेगळे राहायला लागलो पण सण आणि वाढदिवसांना आम्ही एकत्र असतो आणि मिळून सर्व साजरे करतो त्यामुळे मला अजूनही मी एकत्र कुटुंब पद्धत असल्या सारखंच वाटतं."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.