ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफने गायले 'वंदे मातरम', गाण्यासाठी दिशा पाटनी झालीय उतावीळ - टायगर श्रॉफचे नवे गाणे

अनबिलिव्हेबल आणि कॅसीनोव्हा ही दोन गाणी हिट झाल्यानंतर टायगर श्रॉफने वंदे मातरम या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्ट रोजी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चाहत्यासोबतच टायगर्ची खास मैत्रिण दिशा पाटनीदेखील या गाण्यासाठी उत्साहित आहे.

tiger-shroff-teases-new-single-vande-mataram-
टायगर श्रॉफने गायले 'वंदे मातरम
author img

By

Published : Aug 6, 2021, 8:03 PM IST

मुंबई - अॅक्शन स्टार टायगर श्रॉफने तिसऱ्यांदा गायक म्हणून स्वतःला सिध्द केले आहे. यापूर्वी अनबिलिव्हेबल आणि कॅसीनोव्हा ही दोन गाणी हिट झाल्यानंतर टायगर श्रॉफने वंदे मातरम या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्ट रोजी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वंदे मातरमचे दिग्दर्शन रेमो डिसूझा यांनी केले आहे आणि जॅकी भगनानीच्या जस्ट म्युझिकने याची निर्मिती केली आहे.

टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर फर्ट लूक शेअर करीत या गाण्याविषयी लिहिले आहे, "मी पहिल्यांदाच अशा प्रकारचे गाणे गाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे वंदे मातरम हे माझे नवे गाणे तुम्हाला शेअर करताना एकाचवेळी उत्साही आणि नर्व्हसही आहे. हे केवळ गाणे नाही तर ही एक स्वतंत्र भारत दिवस साजरा करीत असतानाची एक भावना आहे. आपल्या भारत देशाला, मानवंदना देण्यासाठी हे खास गाणे शेअर करीत आहे. 10 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे."

टायगरने फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर लगेचच, दिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर ते शेअर केले आणि लिहिले, "थांबू शकत नाही."

टायगरने 2020 मध्ये अनबिलिव्हेबल या गाण्याने गायक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्याचे कॅसीनोव्हा हे गाणेदेखील हिट झाले. तो उत्तम गायक म्हणून आपली नवी ओळख तयार करीत असून या गाण्याच्या व्हिडिओमध्ये तो उत्तम नृत्य करतानाही दिसतो. त्यामुळे त्याच्या आगामी वंदे मातरम गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत.

हेही वाचा - 'राणादा'चं पक्क ठरलं, हार्दिक जोशी नव्या मालिकेत मांडणार 'नवा संसार'!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.